Join us

'द नाइट मॅनेजर'मध्ये शोभिता धुलिपाला ऐवजी झळकली असती जेनिफर विंगेट, अभिनेत्री म्हणाली - "रिजेक्शनमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 19:15 IST

The Night Manager Web Series : 'द नाइट मॅनेजर' वेबसीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या वेबसीरिजच्या कथानकासोबत कलाकारांच्या अभिनयाचेही सर्वत्र खूप कौतुक झाले. या सीरिजमधून आदित्य रॉय कपूरने ओटीटीवर पदार्पण केले.

'द नाइट मॅनेजर' (The Night Manager) वेबसीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. या वेबसीरिजच्या कथानकासोबत कलाकारांच्या अभिनयाचेही सर्वत्र खूप कौतुक झाले. या सीरिजमधून आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapoor)ने ओटीटीवर पदार्पण केले. त्याच्याशिवाय शोभिता धुलिपाला (Shobhita Dhulipala) आणि अनिल कपूर(Anil Kapoor)देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, या सीरिजमध्ये शोभिताच्या जागी अभिनेत्री जेनिफर विंगेट (Jennifer Winget) पाहायला मिळाली असती. तिने कावेरीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र शेवटी ही भूमिका शोभिताच्या पदरात पडली. दरम्यान आता जेनिफरने याबाबत खुलासा केला आहे. 

जेनिफर विंगेटने नुकतेच एका मुलाखतीत द नाइट मॅनेजर सीरिज हातातून निसटल्याचे सांगितले. ती म्हणाली की, जेव्हा असे झाले तेव्हा ती खूप निराश होती. मात्र, आयुष्य पुढे जात असते, असा तिचा विश्वास आहे. तिचा आवेश आणि उत्साह असूनही तिला शोमध्ये काम मिळाले नाही, असा खुलासाही तिने केला.  

३९ वर्षीय जेनिफर म्हणाली, 'असे अनेक वेळा झाले आहे. मला मूळ सीरिज खूप आवडली. शोभिताच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिले होते आणि शोमध्ये आदित्य रॉय कपूर होता. पण हरकत नाही.' अभिनेत्री पुढे म्हणाली, 'नक्कीच, तुम्हाला अस्वस्थ आणि दुःखी वाटत असेल, परंतु आयुष्य पुढे जाते आणि काहीतरी चांगले घडते. माझा खरोखर विश्वास आहे की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट माझ्यासाठी कार्य करत नाही तेव्हा काहीतरी चांगले घडणार असते.

जेनिफर या शोमध्ये दिसली शेवटची जेनिफर शेवटची सोनी लिव्हच्या 'रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी' या शोमध्ये दिसली होती. त्यात करण वाही आणि रीमा समीरही दिसले होते. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती 'अकेले हम अकेले तुम', 'राजा की आयेगी बारात', 'कुछ ना कहो' आणि २०१८ मध्ये 'फिर से...' मध्ये दिसली आहे. टीव्हीवर तिने २०२० मध्ये 'बेहद २' मध्ये मायाची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी तिचा Guli Mata हा म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच गाजला होता. त्याला ३३८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले.

टॅग्स :जेनिफर विगेंटआदित्य रॉय कपूरअनिल कपूर