Join us

बॉलिवूडमधली मोठी घडामोड; आमिर खान - किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 12:00 PM

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद.

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते म्हणजे आमिर खान आणि किरण राव यांचे १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घटस्फोटाची बातमीने मोठा धक्काच बसला आहे.

 

दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही. किरण रावसहआमिर खानचे दुसरे लग्न होते.घटस्फोट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.

कशी झाली दोघांची भेट?

 एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती.माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.

टॅग्स :आमिर खानकिरण राव