'केसरी' आणि 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. मात्र, आता या सर्व प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नहारच्या गळ्यावर संशयास्पद निशाण आढळले आहेत. गोरेगाव पोलीस याची सखोल तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारने आत्महत्या केली तेव्हा पत्नी कांचन शर्माने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर तिने संदीप नहारला घराजवळच्या रुग्णालयात नेले. पण तिथल्या रुग्णालयाने संदीपला अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. जेव्हा ती दुसर्या रुग्णालयात पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले.
संदीपच्या गळ्यावर आढळल्या जखमाआता या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांना संशय येत आहे. कारण संदीपच्या गळ्यावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा सायबर सेल संदीप नहारच्या सोशल मीडिया अकाउंटवरही चौकशी करत आहे. संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यानं कौटुंबिक आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचं म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
काय म्हटलंय आत्महत्येआधी पोस्ट केलेल्या व्हिडीओत? याशिवाय संदीपने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असे सांगितले. संदीप नहार याने शेअर केलेल्या १० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'मी तुम्हाला बर्याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की माझ्या आयुष्यात बर्याच समस्या आहेत. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कंचन शर्मा आहे. मी दीड- दोन वर्षांपासून एका मानसिक ताणात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितले. आमचं ३६५ दिवस भांडण होतं.'