Join us

Shocking ! चाहतीने दिली वरूण धवनच्या गर्लफ्रेन्डला जीवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 1:16 PM

होय, एका चाहतीने वरूणच्या नाकीनऊ आणले आहे. इतके की, आता तिने चक्क वरूणची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल  हिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आपल्या चाहत्यांना अगदी मनमोकळेपणाने भेटतो. पण यावेळी मामला जरा वेगळा आहे. होय, एका चाहतीने वरूणच्या नाकीनऊ आणले आहे. इतके की, आता तिने चक्क वरूणची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल  हिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.ही चाहती गेल्या अनेक दिवसांपासून वरूणचा पाठलाग करतेय. अलीकडे वरूणला भेटायला ती त्याच्या घरी जावून पोहोचली. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, वरूणला भेटायचेच, असे ठरवून तिने त्याच्या घरासमोर ठाण मांडले. वरूण त्यावेळी घरी नव्हता.

सिक्युरिटी गार्डने या चाहतीला अनेक पद्धतीने समजावून पाहिले. वरूण घरी नाही, त्यामुळे आज तुला तो भेटू शकणार नाही, असे त्यांनी तिला सांगितले. पण हे ऐकताच ती चाहती बिथरली आणि तिने गोंधळ घालणे सुरु केले. यानंतर अचानक मी वरूणची गर्लफ्रेन्ड नताशाला जीवे मारेल, अशी धमकी तिने दिली. तिचा गोंधळ इथेच थांबला नाही तर, मी स्वत:ला जखमी करून घेईल, अशा धमक्याही ती देऊ लागली. यानंतर सिक्युरिटी गार्डने थेट पोलिसांची मदत घेणे, योग्य समजले आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. अर्थात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. वरूणची बाजू ऐकून घेतल्यानंतरच आम्ही एफआयआर दाखल करू, असे पोलिसांनी म्हटले.

यापूर्वी एका चाहतीने वरूणला आत्महत्येची धमकी दिली होती. ही चाहती वरुणला व्हॉट्स अ‍ॅपवर सतत मेसेज करत होती.   तिच्या मेसेजला कंटाळून वरुणने अखेर तिचा नंबर ब्लॉक केला होता. पण तिचा नंबर ब्लॉक केल्यानंतर काही दिवसानंतर वरूणला पुन्हा अनोळखी नंबरवरून कॉल्स येऊ लागले. हा अनोळखी नंबर एका मुलाचा होता.   तू तिच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला उत्तर दिले नाहीस तर ती आत्महत्या करेल, अशी धमकी या मुलाने दिली होती. यानंतर वरूणने पोलिसांची मदत घेतली होती.

टॅग्स :वरूण धवन