हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता केसवानी ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. तिने अभिमान, कहानी घर-घर की आणि देश में निकला होगा चांद यासारख्या बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. नुकतेच तिचा दे मेड अस (They Made us) हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला आहे. नुकतेच तिने दिलेल्या मुलाखतीत टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल खुलासा केला आहे.
श्वेता केसवानी म्हणाली की, माझ्यासोबत अनेकदा कास्टिंग काउचचा प्रकार घडला आहे. त्यामुळेच मी टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली. कारण त्यावेळी टेलिव्हिजनवर कोणतेही कास्टिंग काऊचसारखे प्रकार घडले नव्हते. इथे कास्टिंग काऊचसारखी घटना घडलेली नसली तरी गटबाजी नक्कीच होते, याचा अनुभव मला आला. यात एकता कपूरच्या गटाचाही समावेश आहे. त्या गटात फक्त आणि फक्त एखाद्या आवडत्या कलाकारांनाच पहिले प्राधान्य मिळते, पण मला त्यादेखील गोष्टी पटल्या नाहीत. मला याचा काहीही फरक पडत नाही. कारण मी कधीही एकता कपूरसोबत काम केलेले नाही.