जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही या व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे कित्येक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. अशात बॉलिवूडमधील बरेच किस्से व जुन फोटो व व्हिडिओ पहायला मिळत आहे. यादरम्यान प्रियंका चोप्राची एक मुलाखत व्हायरल होताना दिसत आहे. यात ती बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल बोलत आहे. यादरम्यान तिने बरेच धक्कादायक खुलासे केले. प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये आली होती त्यावेळी तिचे कुणीच गॉडफादर नव्हते. तिला इंडस्ट्रीत तिचे स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. तिचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या मुलाखतीत ती सांगतेय की, ती जेव्हा इंडस्ट्रीत आली होती तो खूप कठीण काळ होता. मी इथे कुणालाच ओळखत नव्हते. जेव्हा मी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते त्यावेळी इथे प्रत्येक जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते.
Shocking! प्रियंका चोप्रासमोर दिग्दर्शकाने कपड्यांवरून केली होती अश्लील कमेंट, मग तिने केले असे काही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:23 PM