बघावे तिथे सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोणीच कोरोनाव्यतिरिक्त सध्या बोलताना दिसत नाही. अख्ख्या जगाला कोरोना या व्हायरसने चांगलीच धडकी भरवली आहे. त्यामुळे कोरोनाविषयी योग्यप्रकारे जनजागृती करण्याचेही काम सध्या सगळेच सेलिब्रेटी करत आहेत. अशात मात्र एक अभिनेत्री आहे जिने कोरोनाची इतकी धास्ती घेतली की तिला चक्क पॅनिक अटॅकही येऊन गेला. ही अभिनेत्री आहे. गॉर्जिअस मंदिरा बेदी. मुळात बंदिरा बेदी ही खूप फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. नित्यनियमाने ती योगा आणि वर्कआऊट करत स्वतःचा फिटनेस मेंटेन केला आहे. वयाची चाळीशी पार केलेल्या या अभिनेत्रीचा फिटनेस पाहून भल्याभल्यांची बोलती बंद होते तक तिचे फिटनेस फंडा इतरांना अशाच प्रकारे फिट राहण्यासाठी प्रेरणा देतात.
मात्र नेमके असे काय झाले असावे की, ती चक्क कोरोनाला घाबरली. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वीच ती परदेशातून आली होती. शासनाच्या आदेशाप्रमाणे तिने स्वतःला सेल्फ क्वॉरंटाईन देखील करून घेतले होते. मात्र परदेशातून आलेल्यांनाच कोरोनाचा सर्वात जास्त धोका उद्भवत असल्यामुळे तिने याच गोष्टीची सर्वात जास्त धास्ती घेतली आणि म्हणून तिला पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे वारंवार सांगण्यात येत आहे की, कोरोनापासून घाबरू नका फक्त योग्य ती खबरदारी घ्या. कोरोना हा संसर्गामधून होत असला तरी तो बरो होतो याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे पॅनिक न होता. योग्य ती काळजी घ्या आणि लोकांच्या संपर्कात येणे टाळा आणि घरीच राहा याच सुचना पाळणे प्रत्येकाला गरजेचे आहे.
तसेच दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितले की,वुमेन क्रिकेट वर्ल्डकपसाठी ती ऑस्ट्रेलियामध्ये होती. ९ मार्चला ती भारतात परतली. खबरदारी म्हणून १४ दिवस तिने स्वतःला एका बंद खोलीत बंदिस्त म्हणजे सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते. १४ दिवसांत कोरोनाती लक्षणं समोर येतात त्यामुळे मी माझी योग्य काळजी घेतली. या दरम्यान मी इतकी घाबरली होती, मला कोरोनाची लागण तर नाही झाली? याच प्रश्नाने मला सर्वात जास्त ग्रासले होते त्याचा परिणाम शेवटी मलाच भोगावा लागला आणि अस्थमाचा अटॅक आला.
मुळात आजही आपल्याकडे या गोष्टीकडे पाहिजे तितके गांभिर्याने घेतले जात नाही. त्या दिवशी मी असेच काही लोकांचे व्हिडीओ पाहिले आणि मी खूप निगेटीव्ह झाली. या गोष्टीचा मी इतका विचार केल्यामुळेच मला अटॅक आला होता. हे सगळे निराशाजनक व्हिडीओ पाहिल्यानंतर मी सकाळीच ५.३० वाजता ताडकन उठली माझी झोपच उडाली होती.
यावरून मी इतरांना हेच सांगेन की, असा परिस्थितीत तुम्ही सकारात्मक राहा, नकारात्मक ऊर्जापासून लांबच राहा. आपले नेहमीचे रूटीन तसेच सुरू ठेवा. घरातच बसून नित्यनियमाच्या गरजेच्या गोष्टी करा, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या.