Join us

गर्भनिरोधक गोळ्या घेवून पूर्ण करावे लागले शूटिंग, प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 8:09 PM

'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसोबत दिसली होती. हा चित्रपट फक्त काही स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता.

चंदेरी दुनिया जितकी ग्लॅमरस वाटते तितकंच तिचं वास्तवही भयानक आहे. या इंडस्ट्रीत कलाकारांना एक संधी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. त्यात जर तुम्हाला कोणी गॉडफादर मिळालाच दर संधी मिळणं थोडं सोपं होतं. पण जर कोणीच गॉडफादर नसेल तर स्ट्रगल हे आलेच. नशीबाने कधी कोणी संधी दिलीच तर नवीन कलाकार त्या संधीचं सोनं करतात. 

स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करतात. अशाच अभिनेत्रीपैकी एक आहे राधिका मदान. राधिका मदानने मोठ्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकदा तिलाही रिजेक्शनचा सामना करावा लागला. इतकंच काय तर, ती सुंदर दिसत नाही असे म्हणत तिला नाकारले गेले होते. मागे वळून पाहाताना भूतकाळातील काही गोष्टी राधिकाला विसरणंही अशक्यच आहे. दिलेल्या एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला कराव्या लागलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला होता.

“मला पहिल्या शॉटसाठी गर्भनिरोधक गोळी घेण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्याच वेळी माझे आई-वडील मला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीला येत होते. जेव्हा माझ्या वडिलांनी त्या गोळ्या पाहिल्या तेव्हा त्यांच्या पाया खालची जमीनच घसरली होती. त्यांनी कधीही कल्पना आणि विचारही केला नसेल. राधिकाने सांगितले की, मी पण आतून खूप घाबरले होते. पण नंतर सगळं काही ठिक झालं आणि मला वाटले की शूटिंगनंतर सर्वजण माझ्या पहिल्या शॉटचे कौतुक करतील. पण त्यावेळी असे काहीच झाले नाही."

'मेरी आशिकी तुमसे ही' या टेलिव्हिजन शोमधून राधिकाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. छोटा पडदा गाजवल्यानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली. यानंतर विशाल भारद्वाजच्या 'पटाखा' या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते.खरंतर राधिकाचा डेब्यू 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटातून होणार होते. कारण या चित्रपटाचे शूटिंग राधिकाने 'पटाखा' चित्रपटाच्या पूर्वीच पूर्ण केले होते.

राधिका 'मर्द को दर्द नहीं होता' या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीसोबत दिसली होती. हा चित्रपट फक्त काही स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नव्हता. दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात राधिका मदानने भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

टॅग्स :राधिका मदनइरफान खान