लहान मुलांच्या सुरक्षेवर भाष्य करणारी शॉर्ट फिल्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:08 PM2019-01-23T15:08:40+5:302019-01-23T15:18:01+5:30

कारमधले “हेडरेस्ट” अडकण्याच्या स्थितीत काच तोडण्यासाठी बनवलेले असते या गैरसमजूतीला स्पष्ट करणे आणि आपात्काळात तुमच्या मुलांना काच तोडण्याऐवजी वैकल्पिक माहिती देण्याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे

Short film tallk about child security | लहान मुलांच्या सुरक्षेवर भाष्य करणारी शॉर्ट फिल्म

लहान मुलांच्या सुरक्षेवर भाष्य करणारी शॉर्ट फिल्म

googlenewsNext
ठळक मुद्देहा चित्रपट प्रवाशांच्या खासकरुन मुलांच्या सुरक्षेवर आधारलेला आहे

भारतीय प्राधिकरणांना रस्त्यावरील सुरक्षा ही सर्वात महत्वपूर्ण असलेली सार्वजनिक आरोग्य समस्या भेडसावते आहे. जगभरामध्ये  होणाऱ्या रस्त्यांवरील मृत्यूपैकी भारतात 139,000हून जास्त रस्त्यावरील अपघात व इजा होत असून त्यांची टक्केवारी जागतीक आकड्याच्या तुलनेत 10% आहे. दिनांक 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये “सडक सुरक्षा-जीवनरक्षा” ही संकल्पना घेऊन मॅक्सिमस फिल्म्स स्माइल फाऊंडेशनच्या सहयोगाने “हेडरेस्ट” नावाच्या जन सेवा चित्रपटाच्या परिचयाची घोषणा करीत आहेत. समाजावर मोठ्याप्रमाणात परिणाम करत असलेल्या विविध समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी वचनबध्द असलेल्या हेडरेस्टचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक संदीप एम. सिंग करत आहेत, त्यांना हिस्ट्री चॅनल अँड ऍडवर्टिजमेंट सोबतच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी ओळखले जाते. 

कारमधले “हेडरेस्ट” अडकण्याच्या स्थितीत काच तोडण्यासाठी बनवलेले असते या गैरसमजूतीला स्पष्ट करणे आणि आपात्काळात तुमच्या मुलांना काच तोडण्याऐवजी वैकल्पिक माहिती देण्याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. हा चित्रपट प्रवाशांच्या खासकरुन मुलांच्या सुरक्षेवर आधारलेला आहे. 

“साधारण पाच वर्षांपूर्वी मी वर्तमानपत्रात कारमध्ये अडकल्यामुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्यावरचा लेख वाचला होता. या तीन मुलांना बाहेर कसे पडावे हे माहित नव्हते आणि ही कार वर्दळ नसलेल्या ठिकाणी होती. त्यांच्या आरोळ्या कुणीही ऐकू शकले नाही, आणि त्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेने माझा अक्षरश: थरकाप उडाला, असे हेडरेस्टचे दिग्दर्शक आणि मॅक्सिमस फिल्म्सचे संस्थापक श्री संदीप एम.सिंग म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, “याचा परिणाम म्हणून मी कारमध्ये सेफ्टी टूल्स ठेवू लागलो आणि मी माझ्या मुलीला देखील ते वापरायला शिकवले. एक दिवस मी सोशल मीडियावर “हेडरेस्ट काच तोडण्यासाठी असतात” अशी एक पोस्ट वाचली, जे वास्तवात सत्य नाही आहे. हा एक गैरसमज आहे! आमच्या जनसेवा चित्रपट हेडरेस्टच्या माध्यमातून आम्हाला तुमच्या मुलांना आपात्कालीन परिस्थितीमध्ये काच तोडण्याऐवजी दुसरा पर्यायी उपाय सांगण्याबद्दल जागरुकता निर्माण करावीशी वाटते.” 

Web Title: Short film tallk about child security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.