कुटुंबातील हरवलेलं ‘शेअरिंग’ वाढवावं-मोना सिंग

By अबोली कुलकर्णी | Published: July 4, 2018 06:41 PM2018-07-04T18:41:35+5:302018-07-04T18:51:56+5:30

अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्यासोबतच आकर्ष खुराना हे देखील तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  should increase the lost family's share-Monna Singh | कुटुंबातील हरवलेलं ‘शेअरिंग’ वाढवावं-मोना सिंग

कुटुंबातील हरवलेलं ‘शेअरिंग’ वाढवावं-मोना सिंग

googlenewsNext

अबोली कुलकर्णी
 
 ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके  भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्यासोबतच आकर्ष खुराना हे देखील तिच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांनी लोकमत आॅफिसला भेट दिली. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयीच्या आणि वेबसीरिजविषयीच्या प्रवासाविषयी मारलेल्या या गप्पा...

* मोना - डिजिटलायजेशनच्या जमान्यात टीव्ही आणि वेबसीरिजमध्ये काम करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा तुला सामना करावा लागला?
- सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यामुळे वेबसीरिजकडे निर्माते, दिग्दर्शक जास्त वळताना दिसत आहेत.  टीव्ही माध्यमांत कलाकारांना रोजच शोसाठी शूटिंग करावे लागते. त्यामुळे क्वालिटी काम होईलच असे नाहीये. वेबसीरिजच्या बाबतीत तसे होत नाही. त्यासाठी संपूर्ण ‘प्लॅन आॅफ अ‍ॅक्शन’ तयार असतो. स्क्रिप्ट, वर्कशॉप्स, ट्रेनिंग या सगळया गोष्टी होतात. मात्र, टीव्हीच्या बाबतीत तसे होत नाही. क्वालिटी वर्क करायला मिळत नाही.

* मोना - कोणत्याही प्रोजेक्टससाठी भूमिका निवडताना तू कोणत्या गोष्टींचा विचार करतेस?
- चांगला कंटेंट माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. मी केव्हाही माझ्या प्रेक्षकांचा विचार करते कारण प्रेक्षकांना आता व्हरायटीचा कंटेंट हवा असतो. एक सारख्या भूमिका त्यांना नकोशा होतात. त्यामुळे चांगली भूमिका एक चांगला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा, असे वाटते. 

* मोना - भूमिकेसाठी तू तयारी कशी करतेस?
- माझ्या प्रोजेक्टच्या दिग्दर्शकांना माझ्याकडून अभिनयाच्या बाबतीत जे काही हवे असेल ते मी नेहमी देण्याचा प्रयत्न करते. कलाकार म्हणून माझ्यासाठी ती अभिमानाचीच गोष्ट असेल की मी माझ्या चाहत्यांना अभिनयाच्या माध्यमातून समाधानी करतेय. कलाकारांसाठी त्यांची भूमिका ही सर्वांत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यासाठी आवश्यक ती सर्व मेहनत घेण्यात कसूर सोडत नाही.

* आकर्ष - आजच्या जमान्यात कुटुंबावर आधारित मालिका सुरू करण्यात आव्हान वाटते का?
- या वेबसीरिजची कहानी ९०च्या दशकांतली आहे. कुटुंब, नीतीमूल्ये, आचार-विचारांचं आदानप्रदान हे त्या दशकांत व्हायचं. आज डिजिटलायजेशनमुळे हेच शेअरिंग कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. अशा मालिका सुरू करताना आव्हान तर नक्कीच वाटते. पण, तेवढीच मजा देखील येते की, आपण प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही हे बघताना. 

* मोना - अभिनयाशिवाय तुला काय करायला जास्त आवडते?
- खरंतर मला कुकिंग करायला खूप आवडते. मी आणि माझी आई आम्ही यूट्यूबवरून खाद्यपदार्थांचे व्हिडीओ डाऊनलोड करून तशा पाककृती करत असतो. मला याशिवाय पुस्तके वाचायला खूप आवडते. नेटफ्लिक्सवर शोज मी बघत असते. मला घरच्यांसोबत फिरायला जायला प्रचंड आवडतं. मी आता आॅगस्टमध्ये त्यांच्यासोबत फिरायला जाणार आहे.

* मोना - तू कलाकार नसतीस तर कोणत्या क्षेत्रात काम करायला तुला आवडले असते?
- मी माझ्या वडिलांप्रमाणे आर्मी जॉईन केले असते. माझ्यावर आई-वडिलांनी लहानपणापासूनच देशप्रेमाचे संस्कार केले आहेत. त्यामुळे मला ती ओढ कायम आहे.

* मोना - तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? काय शिकायला मिळाले?
- मी या वेबसीरिजमध्ये एका आईची भूमिका साकारत आहे. लहानपणी आपल्याला आई रागवत असते ते आपल्या भल्यासाठीच असते. तेव्हा आपल्याला राग येतो पण, आपली भलाई कशात आहे हे तिच्यापेक्षा जास्त कुणालाच कळत नाही. एखादं साधं कॅरेक्टर साकारणं आणि आईची भूमिका साकारणं यात खूप फरक आहे. आता मी जेव्हा आईची भूमिका साकारत आहे, हे कळाल्यावर तिला खूप चांगले वाटले. तिने मला नेहमीच समजून घेतले आहे. तिला माझा अभिमान वाटतो.

Web Title:   should increase the lost family's share-Monna Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.