Join us

शो मस्ट गो ऑन....बोट फ्रॅक्चर असतानाही दुखणं लपवून रसिकांना हसविले अभिनेत्री सुप्रिया पाठारेने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 3:51 PM

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा नुकताच ठाण्यात राम गणेश गडकरी प्रयोग पार पडला.

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित 'दहा बाय दहा' नाटकाचा नुकताच ठाण्यात राम गणेश गडकरी प्रयोग पार पडला. या नाटकात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिचे एका हाताच्या मधले बोट फ्रॅक्चर असतानादेखील तिने आपले दुखणे बाजूला ठेवून रसिकांना आपल्या अभिनयाने खळखळून हसविले. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचे मधले बोट फ्रॅक्चर झाले असून त्याची सोमवारी सर्जरी होणार आहे. त्यांचे बोट दुखत असतानादेखील त्यांनी सपोर्टर लावून तिने प्रयोग केला. प्रयोगादरम्यान कुठेही तिने चेहऱ्यावर दुखत असल्याचे दाखवून दिले नाही.

सुप्रिया पाठारेची मैत्रीण सुरभी भावे ठाण्यात राम गणेश गडकरी नाट्यगृहात प्रयोग पाहण्यासाठी गेली होती. नाटक पाहिल्यानंतर तिने या नाटकावर प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितले की, मी आताच दहा बाय दहा नाटक पाहिले. अतिशय सुंदर, कॉमेडी व उत्तम अभिनय या नाटकात पहायला मिळतो. खूप हसायला मिळाले. सुप्रिया व विजय पाटकर यांनी खूप छान काम केले आहे. मी सुप्रिया ताईसोबत एका मालिकेत काम केले आहे. ताईचे विनोदी ट्युनिंग इथे पहायला मिळाले. खरेतर सुप्रिया ताईच्या एका बोटाला थोडेसे फ्रॅक्चर झाले आहे. ते दुःख लपवून लोकांना हसविण्याचे जे काम केले ते आऊटस्टॅण्डिंग आहे. खूप मजा आली. तुम्हीदेखील हे नाटक पहा. 

'दहा बाय दहा'च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावे लागते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारे काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

टॅग्स :विजय पाटकर