कोणत्याही बॉलीवूड चित्रपटामध्ये नाच-गाणे असतेच, बॉलीवूड चित्रपट त्याशिवाय पूर्ण होत नाही! नाच-गाण्यांची अतिशय आवड असलेल्या दर्शकांकरिता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन एबीसीडी २ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर, १० आॅक्टोबरला रात्री ८ वाजता सादर करत आहे. या चित्रपटातून आपले नृत्यकौशल्य सिद्ध करण्याची आस असलेल्या मुंबईच्या डान्स क्रुची कथा सांगण्यात आली आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या एबीसीडीला तुफान यश मिळाले होते, त्याचाच धडा गिरवत एबीसीडी २ ने देखील बॉक्स आॅफिस गाजवले. रेमो डिसूझाचा एबीएसीडी २ हा भारतातील सर्वात मोठा थ्रीडी रीलीज ठरला होता आणि या चित्रपटाने २०१५ मध्ये सर्वाधिक गल्ला जमा करून ओपनिंग वीकेण्डचे सर्व विक्रम मोडले होते.वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नृत्यकौशल्याचा एक सरस नमुना आहे. हा चित्रपट मुंबईतील फिक्शियस डान्स ग्रुपच्या खऱ्याखुऱ्या कहाणीवर आधारलेला आहे. या चित्रपटातून मुंबईतील एका छोट्या उपनगरातून नृत्य स्पर्धेकरिता थेट लास वेगासपर्यंत धडक मारलेल्या आणि वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय डान्स टीम ठरलेल्या फिक्शियस डान्स ग्रुपची कहाणी दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचा नायक वरुण धवनने आपल्या नृत्याने दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडलेच, शिवाय श्रद्धा कपूरनेही आपल्या बिनतोड नृत्यकौशल्याने सर्वांची मने जिंकली. विशाल ददलानीने गायलेले, पाण्याने भरलेल्या स्टेजवर पाय थिरकवत केलेले ‘बेझुबान फिर से’ हे गाणे सर्वांना आवडलेच, शिवाय ‘सुन साथिया’नेही दर्शकांना माना डोलवायला भाग पाडले.वरुण-श्रद्धाची आॅनस्क्रीन केमिस्ट्री केवळ लाजवाब ठरली. पोशाख असो, लोकेशन्स असो वा गाणी असोत, एबीसीडी २ सर्वच आघाड्यांवर डोळ्यांचे पारणे फेडेल असा चित्रपट ठरतो.
श्रद्धा-वरुणच्या ‘एबीसीडी २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर!
By admin | Published: October 10, 2015 4:04 AM