Join us

बापरे! श्रद्धा कपूरने खरेदी केली महागडी Lamborghini, किंमत ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 09:16 IST

मुंबईत पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे (Shraddha Kapoor) लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा स्वभाव चाहत्यांना भलताच आवडतो. नुकतंच या स्टार अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहुर्तावर स्वत:साठी लँबॉर्गिनी कार खरेदी केली आहे. तिचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात श्रद्धा दिसली होती. तर आता तिने दसऱ्याला स्वत:लाच कार गिफ्ट केली आहे. 

Lamborgini Huracan Tecnica ही शानदार महागडी कार कोणा अभिनेत्याने नाही तर चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरने खरेदी केली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिचं कौतुक होतंय. शोरुमची मालकीण पूजा चौधरीने श्रद्धासोबत फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये मागे लाल रंगाची नवी कोरी लँबॉर्गिनी दिसत आहे. अभिनेत्रीने कारसोबत पोज दिली असून नव्या कोऱ्या गाडीतून फेरफटकाही मारला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. Aurtomobilardent या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

श्रद्धाने यावेळी अगदी साधा लुक केला होता. जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, कपाळावर टिकली आणि कानात झुमके अशा साध्या लुकमध्ये ती दिसली. मुंबईत एखाद्या महिलेने ही कार घेणं हे पहिल्यांदाच घडलं आहे अशी माहिती पूजा चौधरी यांनी दिली आहे. 

सर्वात महागडी कार- किंमत काय?

Huracan Tecnica च्या Lamborgini कारची किंमत तब्बल ४ कोटी रुपये आहे. मुंबईतच पहिल्यांदाच एका महिलेने ही कार खरेदी केली आहे. त्यामुळे सर्वांनाच श्रद्धाचा खूप अभिमान वाटतोय. तसंच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. याआधी श्रद्धाकडे BMW 7 होती ज्याची किंमत 2.46 कोटी इतकी होती. तर त्याहीआधी तिच्याकडे Mercedes Benz GLE ही 1 कोटीची कार होती. 

श्रद्धाच्या कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर यावर्षी तिचा 'तू झुठी मै मक्कार' सिनेमा सुपरहिट झाला होता. यामध्ये रणबीर कपूरसोबत ती पहिल्यांदाच दिसली. तर आता ती आगामी 'स्त्री 2' मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरलँबॉर्घिनीमुंबई