Join us

"जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर...", श्रद्धा कपूरचा व्हिडिओ चर्चेत; म्हणते- निब्बा-निब्बी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 12:05 PM

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशातच श्रद्धा कपूरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनयाबरोबरच  अंतरंगी स्वभाव आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. 'आशिकी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या श्रद्धाला पहिल्याच सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'बाघी', 'एक विलैन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'चिछोरे', 'स्त्री', 'ओके जानू' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ती झळकली. श्रद्धा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. अशातच श्रद्धा कपूरच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तिच्या घरातील पाळीव श्वानाबरोबर दिसत आहे. श्रद्धा तिच्या श्वानाला "kiss me" म्हणताच तो तिच्या गालावर चाटत प्रेम व्यक्त करतो. त्यानंतर श्रद्धा म्हणते, "जर तुम्हाला मागितल्यावर kiss मिळत नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीतरी चुकीचं करत आहात." श्रद्धाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओलाही तिने हटके कॅप्शन दिलं आहे. "निब्बा-निब्बी आज कोणता दिवस सेलिब्रेट करत आहेत," असं कॅप्शन श्रद्धाने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने फोटो शेअर करत "लग्न करू का?" असं विचारलं होतं. त्यानंतर श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता तिच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :श्रद्धा कपूरसेलिब्रिटीव्हॅलेंटाईन वीक