Join us

Shraddha Walker Murder Case : तुम्हाला माझं हे लिहिणं झोंबणार कारण...., श्रद्धा हत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्रीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:29 PM

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहेत. आता मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) हिने एक पोस्ट लिहिली आहे..

Shraddha Walker Murder Case : अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी (Shraddha Murder Case) रोज नवे खुलासे होत आहेत. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताबने आधी श्रद्धाची गळा आवळून हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाला अर्ध्या रात्री आंघोळ घातली आणि नंतर दुसऱ्या दिवशी बाथरूममध्ये तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवले आणि नंतर एक एक करून त्याची विल्हेवाट लावली.

सहा महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि अख्खा देश हादरला. या संतापजनक घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहेत. आता मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) हिने या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने देविका हे पात्र साकारणाऱ्या राधिकाची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

 श्रद्धाची पोस्ट तिच्याच शब्दांत...

अंधश्रद्धाआम्ही श्रद्धेनं देवाचं नेटानं करतो. आमची देवावर नितांत श्रद्धा आहे. आमचा कृष्ण त्यामुळे आमचे रक्षण करतो. त्यामुळे आमच्या घरी 'ती' श्रद्धा नाही. म्हणजे "मेरा अब्दुल वैसा नहीं है" सारखंच नाही का?ज्या श्रद्धेचं वारंवार आपल्याला सध्या कानी पडतं आहे ती आमची नाही. ती दुसऱ्याची. मुळात आमच्याकडे श्रद्धाच नाही. आणि तेच खरं आहे. आपल्याकडे आहे ती अंधश्रद्धा. जे झालं, जे होतं आहे ते दुसऱ्याच्या घरी, शेजारी. आपल्या घरातले देव देव्हाऱ्यात सुखरूप राहावेत म्हणून आपण मनाची कवाडं बंद ठेवतो. घराचं दार बंद करून डोळे मिटून घेतो आणि अंधारात सूख मानून घेतो. त्या श्रद्धा कडे बोट दाखवत बाकीची बोटं मुठीत झाकून टाकतो. कारण आपल्याला अज्ञानात सुखी राहायची सवय झाली आहे. अंगाला लावून न घेण्याची सवय झाली आहे. तुम्हाला माझं हे लिहिणं झोंबणार कारण मी बोट ठेवते आहे आपल्या पांगुळपणावर.

आपली "श्रद्धा संपली आहे" हे आपल्याला मान्यच करायचं नाही आहे. मुळात ती आपली कशी? आपलं रक्त आटत नाही, तळ पायाची आग मस्तकात जात नाही. आपण पेटून उठत नाही. नाही, नाही, नाहीच होत आपल्याला काही असं. कारण आपण फक्त बघायचं काम करतो. डोळे उघडून, जागरूक होऊन खरी परिस्थिती कधी समजून घेणार? त्यांचा "अजेंडा" आहे, त्यांची "टूल कीट" कधी आपल्या डोक्यात शिरणार? आपण खोटं खोटं आणि सतत खोटं बोलणाऱ्या नेत्यांचे कॉमेडी शोज बघत बसणार, विनाकारण जोडो जोडो म्हणणाऱ्यांचे गोड गोंडस फोटो बघत राहणार! मुघलांनी ज्या ज्या देशांवर राज्य केलं तो तो देश बहुसंख्य मुस्लिम झाला. हिंदू आया बहिणींचे वाटोळे करण्याचे प्रयत्न आज ही सुरू आहेत. डोळ्यावरची पट्टी काढा. जरा इतिहासात झाकून बघा. मला आपल्या भारत मातेला प्रश्न विचारायचा आहे. का तू ‘सबुरी‘ ठेवली आहेस अजूनही? का श्रद्धा आहे तुझी तुझ्या लेकरांवर?

"भारत तेरे टुकड़े होंगे" म्हणणाऱ्यांनी त्या भारतीचे तुकडे तुकडे करून दाखवले, तरी आपण कातडी बचाऊ रिएक्शन देणार. आज मी लिहिले कारण मला तुम्हाला काहीतरी सुचवावेसे वाटले. पटले तर घ्या नाहीतर विचारांचे श्राद्ध घालून मोकळे होण्याचा मार्ग आहेच..., असे राधिका देशपांडेंने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :श्रद्धा वालकरमराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार