Join us

दिव्य दृष्टी’च्या सेटवर श्रेणु परिखने दिली सरप्राईज visit !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 19:00 IST

दोन अतिशय लोकप्रिय मालिकांतील प्रमुख कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा ती भेट नक्कीच खास असते. ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर अलीकडे नुकतीच अशी महत्त्वपूर्ण भेट घडली.

ठळक मुद्दे श्रेणु परिख हिने अनपेक्षितपणे ‘दिव्य दृष्टी’ मालिकेच्या सेटला भेट दिली.

दोन अतिशय लोकप्रिय मालिकांतील प्रमुख कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा ती भेट नक्कीच खास असते. ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर अलीकडे नुकतीच अशी महत्त्वपूर्ण भेट घडली. ‘स्टार प्लस’वरील ‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या नव्या मालिकेत जान्हवी मित्तल या  नायिकेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री श्रेणु परिख हिने अनपेक्षितपणे याच वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेच्या सेटला भेट दिली.

दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार हे जेव्हा एकमेकांचे मित्र असतात आणि ते जेव्हा दुसऱ्याला कलाकाराला भेटण्यासाठी त्याच्या मालिकेच्या सेटवर जातात, असे दृष्य हे तसे दुर्मिळच असते. आताही तसेच घडले. श्रेणु परिखने ‘दिव्य दृष्टी’तील कलाकारांची भेट घेऊन त्यांना सुखदाश्चर्याचा धक्का देण्याचा आणि त्यांच्याबरोबरच दुपारचे जेवणं करण्याचा निर्णय घेतला आणि ती ‘दिव्य दृष्टी’ मालिकेच्या सेटवर जाऊन पोहोचली.

सूत्रांनी सांगितले, “श्रेणु परिखचेही चित्रीकरणाचे वेळापत्रक खूपच बिझी होते. तरीही तिने दिव्य दृष्टीच्या सेटवर जाऊन आपल्या मित्रांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. आध्विक महाजन, मानसी श्रीवास्तव आणि नीरा बॅनर्जी यांच्याशी श्रेणूचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांना अचानक भेटीने चकित करण्याचा तसंच त्यांना गुजराती भोजन खिलविण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी तिने आपल्या चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून मुद्दाम वेळ काढला आणि आपल्या मित्रांसोबत काही काळ आनंदात व्यतीत केला. तिच्या आगमनाने सेटवर सर्वत्र एकदम आनंदाची लहर उठली आणि सर्वांनी तिचं स्वागत केलं. त्यांच्यात हास्यविनोद होत होते आणि सर्वांनी खूप धमाल केली.”

दरम्यान, ‘दिव्य दृष्टी’च्या प्रेक्षकांना बरेच अनपेक्षित धक्के बसणार आहेत. कारण दिव्याची भूमिका साकारणारी नीरा बॅनर्जी ही पिशाचिनी बनली आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये त्यांना भरपूर नाट्यपूर्ण प्रसंग पाहायला मिळतील.

टॅग्स :दिव्य दृष्टीस्टार प्लस