Join us  

श्रेयसने 'फ्लॉवर नहीं फायर है में' सकाळी ६ वाजता केला डब, कारण...; वाचा डायलॉगमागचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:16 PM

Shreyas Talpade : श्रेयसने पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुनला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है में हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सिने प्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली होती.

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. लवकरच तो एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बरेच किस्से सांगितले. श्रेयसने पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुनला म्हणजेच पुष्पाला हिंदीत आवाज दिला आहे. हा आवाज आणि त्यातील पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है में हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हिंदी सिने प्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली होती. दरम्यान आता श्रेयसने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पुष्पाच्या लोकप्रिय डायलॉगमागचा किस्सा सांगितला आहे.

श्रेयस तळपदे म्हणाला की, पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है में या डायलॉगचा एक किस्सा आहे. मी रोज सकाळी डबिंगसाठी जायचो. मात्र एक दिवस मी शूट संपवून संध्याकाळी डबसाठी गेलो. एक नॉर्मल सीन मी केला. त्यावेळी ते मला म्हणाले की, सर ट्रेलरसाठी डायलॉग डब करायचा आहे. पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या, फ्लॉवर नहीं फायर है हा डायलॉग होता. मी तो केला आणि घरी गेलो पण मला ते काम समाधानकारक वाटले नाही. मग मी रात्री त्यांना फोन केला आणि म्हणालो की, सर, वो डायलॉग भेजा क्या? तर ते म्हणाले नाही. का, काय झाले? मी सकाळी ६ वाजता येतो आणि फ्रेश आवाजात डब करूयात. आज दिवसभरचा थकलेला आवाज होता. तो घेऊ नका. 

मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता जाऊन फ्रेश आवाजात रेकॉर्ड केला. हा डब केलेला आवाज ऐकल्यावर ते म्हणाले हां, अब बात बनी ना..! मला परत ते काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी खूश झालो, असे यावेळी श्रेयसने सांगितले. 

 

टॅग्स :श्रेयस तळपदेपुष्पाअल्लू अर्जुन