Join us

वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी...

By अमित इंगोले | Updated: October 28, 2020 15:51 IST

आता सिनेमाच्या मेकर्सना श्री राजपूत करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली आहे. 

जेव्हापासून अक्षय कुमारच्या आगामी बहुचर्चीत 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून वादात सापडला आहे. अनेक लोकांनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि सोशल मीडियावरही हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मोहिम चालवली जात आहे. काही लोकांचं मत आहे की, या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे. तर काही लोकांना या सिनेमाच्या टायटलबाबत समस्या आहे. त्यांचं मत आहे की, यातून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता सिनेमाच्या मेकर्सना श्री राजपूत करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली आहे. 

लीगल नोटीसमध्ये देण्यात आलं आहे की, सिनेमाचं 'लक्ष्मी बॉम्ब' हे टायटल हिंदूंची देवी लक्ष्मीसाठी फार अपमानजनक आहे. मेकर्सनी मुद्दामहून देवी लक्ष्मीचा अपमान करण्यासाठी सिनेमाला हे टायटल दिलं आहे. यात असंही म्हणण्यात आलं आहे की, सिनेमाच्या लक्ष्मी बॉम्ब टायटलमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. श्री राजपूत करणी सेनेकडून वकिल राघवेंद्र मेहरोत्रा यांनी ही नोटीस पाठवली आहे. (Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!)

या नोटीसमधून मेकर्सना कोणत्याही अटीशिवाय माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. कारण त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. नोटीसमध्ये देण्यात आलं आहे की, सिनेमातून हिंदू धर्मातील देवी-देवता, रितीरिजाव आणि देवांविरोधात चुकीचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान याआधीही हिंदू सेना नावाच्या संघटनेने या सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली होती. असं नाही झालं तर सिनेमा बॉयकॉट करणार अशी धमकी देण्यात आली होती. (‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी)

टायटलबाबत दिग्दर्शक काय म्हणाला होता?

सिनेमाच्या टायटलबाबत बोलताना राघव लॉरेन्स म्हणाला की, 'आमच्या तमिळ सिनेमाचं मुख्य कॅरेक्टर कंचना होतं. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं. आधी आमही हिंदीतही तेच तमिळसारखंच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी ऑडिअन्सना अपील करू शकू. मग यासाठी 'लक्ष्मी बॉम्ब' पेक्षा चांगलं आणखी काय असू शकलं असतं'. (कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष)

राघव पुढे म्हणाला की, 'देवाच्या कृपेने हे कॅरेक्टर सिनेमात धमाक्यासारखा येतं. त्यामुळे आम्ही हिंदी सिनेमाचं नाव 'लक्ष्मी बॉम्ब'असं ठेवलं. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा धमाका कधी मिस होत नाही त्याचप्रमाणे या सिनेमातील मुख्य भूमिकाही एक ट्रान्सजेंडर आहे आणि तो शक्तिशाली आहे. त्यामुळे हे टायटल आमच्या सिनेमासाठी पूर्णपणे योग्य आहे'.

टॅग्स :लक्ष्मी बॉम्बअक्षय कुमारकरणी सेनाकियारा अडवाणी