आपल्यापैकी अनेकांना जग बघण्याची इच्छा असते. सगळी प्रसिद्ध ठिकाणं फिरायची असतात आणि ते नेहमीसाठी डोळ्यात साठवायचे असतात. हेच स्वप्न बघितलं होतं अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या (Shriya Pilgaonkar) आजोबांनी. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे १०० देश पाहून झालेत. मलेशियात फिरत असताना श्रिया आणि तिची आई सुप्रिया दोघींनी त्यांना सरप्राईज दिलं आणि त्यांच्या ट्रिपमध्ये सामील झाल्या. श्रियाने सोशल मीडियावरुन आजोबांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे
अरुण सबनीस (Arun Sabnis) हे सुप्रिया पिळगावकर यांचे वडील आहेत. ८४ वर्षांचे अरुण सबनीस सध्या मलेशियाला गेले असून त्यांचे आतापर्यंत १०० देश फिरुन झाले आहेत. आजोबांचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.श्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या आजोबांचं लहानपणापासूनचं जग बघायचं स्वप्न होतं. ते ८४ व्या वर्षी आहेत आणि त्यांचे आता १०० देश फिरुन झाले आहेत. मी आणि आईने अचानक या त्यांना जंगलात भेटून सरप्राईज दिले. आम्हीही त्यांची ही सेंच्युरी साजरी करण्यासाठी ट्रीपमध्ये सामील झालो आहोत.'
ती पुढे म्हणाली, ते फक्त माझ्यासाठीच नाही तर जे जे लोक त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. आयुष्य कसं साजरं करायचं आणन प्रत्येक गोष्टीत आनंद कसा शोधायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. माझे आवडते प्रवासी सोबती आणि बेस्ट स्टोरीटेलर! तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू...
श्रियाच्या या पोस्टवर तिची आई सुप्रिया सुळे यांनी लेकीचं कौतुक केलं आहे. त्यांनी कमेंट करत लिहिले, 'तुझ्यासारखी नात मिळाली हे त्यांचंही भाग्यच आहे. फक्त स्वत:च्या नाही तर सर्वच वयोवृद्धांबाबत तुझी असलेली आपुलकी पाहून खूप छान वाटते. '
श्रिया सध्या ओटीटी माध्यमात प्रचंड लोकप्रिय आहे. तिची नुकतीच 'ताजा खबर' ही वेबसिरीज गाजली. यामध्ये तिने पहिल्यांदाच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे. तिची ही वेबसिरीज चांगलीच गाजली.