Join us

मेहनतीचं फळ! 'शुभविवाह' फेम अभिनेता यशोमान आपटेने घेतली शानदार गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

By देवेंद्र जाधव | Updated: April 7, 2025 09:28 IST

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता यशोमान आपटेने नवी गाडी विकत घेतली असून सर्वजण त्याचं अभिनंदन करत आहेत (yashoman apte)

सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत अनेकांचं गाडी घेण्याचं स्वप्न असतं. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गाडी घेण्यासाठी माणसांना अनेक वर्ष वाट पाहावी लागते. मेहनतीच्या जोरावर एखादा माणूस गाडी घेतो तेव्हा त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी तो एक आनंदाचा क्षण असतो. असाच आनंदाचा क्षण यशोमान आपटेच्या (yashoman apte) आयुष्यात घडला आहे. 'फुलपाखरु' मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला आणि सध्या 'शुभविवाह' मालिकेत झळकत असलेल्या अभिनेता यशोमान आपटेने नवी कोरी गाडी खरेदी केलीय

यशोमानने खरेदी केली शानदार गाडी

यशोमानने सोशल मीडियावर नवीन गाडी घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये यशोमानचे आई-बाबा आणि त्याचे इतर कुटुंबीय दिसत आहेत. यशोमानच्या आई-बाबांनी गाडीची पूजा केली. यशोमानने टाटा कर्व्ह (TATA Curvv) गाडी खरेदी केली. ही गाडी महागडी असल्याचं समजतंय. या गाडीची किंमत १० ते १९ लाखांच्या घरात आहे. यशोमानने घेतलेली नवी गाडी ही त्याच्या मेहनतीचं फळ म्हणावं लागेल. यशोमानने नवी गाडी घेतल्याचे फोटो पाहताच त्याच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलंय. 

यशोमानचं वर्कफ्रंट

'फुलपाखरु' मालिकेतून यशोमानने तुफान प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत यशोमानने मानसची भूमिका साकारली. याच मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि यशोमान यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यशोमानने या मालिकेनंतर 'श्रीमंताघरची सून' मालिकेत अभिनय केला. सोनी मराठीवरील या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या यशोमान स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिकेत अभिनय करत आहे. यशोमान खऱ्या आयुष्यात गायकही आहे. त्याने 'फुलपाखरु' मालिकेतील काही गाणी स्वतःच्या आवाजात गायली आहेत.

टॅग्स :यशोमन आपटेटाटाकारऋता दूर्गुळेटेलिव्हिजन