ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - जागतिक महिला दिनाला (८ मार्च) अजून आठवड्याभरावर असला तरी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मात्र त्यापूर्वीच 'स्त्री-पुरूष समानतेचा' संदेश दिला आहे. बच्चन यांनी ट्विटरवर एक इमेज पोस्ट केली असून त्यात ' आपण सर्वजण समान आहोत' असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ' स्त्री-पुरूष समानतेच्या' शिकवणीचा स्वत: अवलंब करत 'मृत्यूनंतर माझ्या सर्व संपत्तींचे मुलगी (श्वेता नंदा) आणि मुलगा (अभिषेक बच्चन) यांच्यात समसमान वाटप होईल' असे त्यांनी या मेसेजमध्ये म्हटले आहे. #Genderequality आणि #WeAreEqual असा हॅशटॅग असलेली बच्चन यांची ही पोस्ट हजारो जणांनी लाईक केली आहे.
भारतात आजही मुलींना लग्नानंतर माहेरच्या संपत्तीवर कोणताही हक्क सांगता येत नाही, वडिलोपार्जित संपत्ती ही मुलाकडे सोपवली जाते. अशी परिस्थिती सर्वत्र दिसत असताना अमिताभ यांनी उचललेले हे पाऊल आणि त्याद्वारे दिलेला ' समानतेचा' संदेश महत्वाचा मानला जात आहे.
T 2449 - #WeAreEqual .. and #genderequality ... the picture says it all !! pic.twitter.com/QSAsmVx0Jt— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 1, 2017