Join us

प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास श्वेता खरात सज्ज; नितीश चव्हाणसोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:01 IST

Shweta kharat:श्वेताने अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिची नवी मालिका पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात (shweta kharat). उत्तम अभिनयासह श्वेता तिच्या बोल्डनेस आणि बिनधास्तपणामुळेही कायम चर्चेत असते. श्वेताने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं असून तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. त्यामुळे तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. 'मन झालं बाजिंद,' राजा रानीची गं जोडी या गाजलेल्या मालिकांनंतर श्वेता आता झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या मालिकेत झळकणार आहे.

सध्या सोशल मीडियावर 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेची चर्चा रंगत आहे. लवकरच झी मराठीवर ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत लागीरं झालं जी फेम नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत त्याच्यासोबत श्वेता स्क्रीन शेअर करणार आहे. या नव्या मालिकेत तिची वर्णी लागली आहे.

marathitvinfo_official या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, या नव्या मालिकेत श्वेता आणि नितीश एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळणार आहे. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री पाहण्यास चाहते उत्सुक झाले आहे. परंतु, या मालिकेत श्वेता नेमकी कोणती भूमिका साकारणार? तिच्या भूमिकेचं नाव काय? हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारनितीश चव्हाण