Join us

श्वेता साकारतेय डबल रोल

By admin | Published: January 28, 2016 2:47 AM

शिक्षण डॉक्टर, इंजिनीअर, एमबीएचे; पण अचानक अभिनय क्षेत्रात किंवा मराठी इंडस्ट्रीत आलेले अनेक कलाकार आहेत. जसे की डॉ. सलील कुलकर्णी, गायिका डॉ. नेहा राजपाल, डॉ. अमोल कोल्हे

शिक्षण डॉक्टर, इंजिनीअर, एमबीएचे; पण अचानक अभिनय क्षेत्रात किंवा मराठी इंडस्ट्रीत आलेले अनेक कलाकार आहेत. जसे की डॉ. सलील कुलकर्णी, गायिका डॉ. नेहा राजपाल, डॉ. अमोल कोल्हे आणि असे अनेक. आता या यादीत अजून एका नावाची भर पडली आहे. केमिस्ट्रीची प्रोफेसर असलेली श्वेता पेंडसे सध्या अभिनयात विशेष कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. नागपूरच्या कॉलेजमध्ये शिकवत असताना महेश कोठारेंच्या ‘जयोस्तुते’ या मालिकेत काम करायची संधी मिळाली आणि ती मुंबईत आली. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या ‘असं सासर सुरेख बाई’ या मालिकेत ती मृणाल दुसानीसच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारत आहे. ही पठ्ठी इथवरच थांबली नाहीये बरं. प्रोफेसर, अभिनेत्रीसोबतच ती एक स्टेज डान्सरदेखील आहे. नुकतीच ‘कौल मनाचा’ या चित्रपटाची कथाही तिने लिहिली आहे आणि त्यात भूमिकाही साकारली आहे. तसेच भीमराव मुळे दिग्दर्शित ‘बार्डो’ चित्रपटातही ती अभिनय करताना पाहायला मिळणार असून, या चित्रपटाचीही स्क्रिप्ट श्वेतानेच लिहिली आहे. त्यामुळे श्वेताला दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळण्याची आशा असणार, हे काही वेगळे सांगायला नकोच. त्यामुळे ती बजावत असलेल्या लेखिका आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.