छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) भोपाळच्या एका कार्यक्रमात बोलली आणि वादात अडकली. मेरी ब्रा का साईज भगवान ले रहे है..., असं वक्तव्य करून वाद ओढवून घेणाऱ्या श्वेताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.भोपाळच्या श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेताविरोधात कलम 295अ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
श्वेता तिवारीचं हे वक्तव्य समोर येताच हिंदू संघटनांनी अभिनेत्रीचा कडाडून विरोध केला इतकंच नव्हे तर राजकीय गोटातही याचे पडसाद उमटले. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.श्वेता तिवारीने जाहिर माफी मागावी, अन्यथा तिच्या आगामी वेबसीरीजचं शूटिंग भोपाळमध्ये होऊ देणार नाही असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.
काय आहे प्रकरणअभिनेत्री श्वेता तिवारी अलीकडे तिच्या ‘शो स्टॉपर-मीट द ब्रा फिटर’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळला गेली होती. या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला. माझ्या ब्रा चं माप देवच घेत आहे..., असं हसत हसत श्वेता या कार्यक्रमात म्हणाली आणि तिच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही श्वेताच्या या विधानाची निंदा केली आहे.
श्वेता तिवारी असं का बोलली?या सर्व प्रकरणानंतर भोपाळमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमाचा होस्ट सलील आचार्य याने स्पष्टीकरण दिलं आहे. सलीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलीलने श्वेताचा बचाव केला आहे.
‘श्वेता तिवारीच्या एका विधानावर गोंधळ होत आहे. परंतु हा गैरसमजाचा भाग आहे. कारण त्यावेळी स्टेजवर मीच होतो आणि मीच एक प्रश्न विचारला होता. श्वेताचं हे विधान याच संदर्भाने होते. स्टेजवर आमच्यासोबत अभिनेता सौरभ जैनसुद्धा होता. सौरभने अनेक पौराणिक भूमिका साकारल्या आहेत. त्याने अनेक मालिकांमध्ये देवाच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे देवाच्या भूमिकेपासून सरळ ब्रा फिटरची भूमिका? असा प्रश्न मी त्याला विचारला होता. यावरच बोलताना श्वेतानं हे विधान केलं होतं. ‘होय, सीरिजमध्ये हाच देव माझ्या ब्राची साइज घेत आहे,’ असं ती हसत हसत म्हणाली होती. तिचा संदर्भ सौरभ साकारत असलेल्या भूमिकेशी होता. मात्र श्वेताचं वक्तव्य पूर्णपणे समजून न घेता, ते चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर आणलं गेलं. मी विनंती करतो की, तिच्या विधानाची मोडतोड करून ते चुकीच्या पद्धतीने सादर करू नका,’ असं सलील म्हणाला.