Join us  

श्वेता झाली संस्कृत शिक्षिका

By admin | Published: October 17, 2016 2:11 AM

श्वेता आता पुन्हा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात करणार का ? तर तसे बिलकूलच नाही आहे.

अभिनेत्री श्वेता पेंडसे संस्कृत शिक्षिका झाली हे ऐकून तिच्या चाहत्यांना असेच वाटले असणार की, श्वेता आता पुन्हा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात करणार का ? तर तसे बिलकूलच नाही आहे. श्वेता ही आगामी ‘कौल मनाचा’ या चित्रपटामध्ये संस्कृत शिक्षिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटांमध्ये येण्याआधी श्वेता शिक्षिकाच होती. आता ती मोठ्या पडद्यावरदेखील पुन्हा एकदा मुलांना शिकविताना दिसणार आहे. एवढेच नाही तर ‘कौल मनाचा’ या चित्रपटाची कथा आणि संवाददेखील श्वेतानेच लिहिले आहेत. याबद्दल श्वेता सांगते, मी हा चित्रपट ज्यावेळी लिहीत होते, तेव्हा मला असे वाटले की, या सिनेमात एक संस्कृत शिक्षिका असावी. कारण, मला स्वत:ला नेहमीच असे वाटते की, संस्कृत भाषेचा प्रसार व्हायला पाहिजे. मी या चित्रपटाच्या निमित्ताने संस्कृत शिक्षिकेचे पात्र उभे केले; पण ही भूमिका साकारणार कोण, हा प्रश्न होता. मग ही भूमिका मी साकारावी असे आमच्या दिग्दर्शकांनी सांगितले. अशाप्रकारे ही संस्कृत शिक्षिकेची भूमिका माझ्या वाट्याला आली. लवकरच आपल्याला समजेल की, श्वेता संस्कृत शिक्षिकेच्या भूमिकेत काय कमाल करतेय. रेड बेरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटाची निर्मिती राजेश सुकलाल पाटील, विठ्ठल हनुमंत रूपनवर, नरशी वासानी यांनी केली असून, सहनिर्मिती निकिता राजेश पाटील यांची आहे.