Join us

कुरळ्या केसांमुळे सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता; सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला ऑडिशनचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 14:31 IST

Siddhant chaturvedi: सिद्धांतला अनेकदा त्याच्या कुरळ्या केसांमुळे नकार पचवावा लागला.

'गली बॉय' या सिनेमातून नावारुपाला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant chaturvedi). कमी कालावधीमध्ये सिद्धांतने बॉलिवूडमध्ये त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना त्याने त्याच्या कुरळ्या केसांमुळे अनेकदा त्याला नकार सहन करावा लागला असं सांगितलं. इतकंच नाही तर शाळेतही त्याला याच केसांमुळे अनेकदा मित्रांनी चिडवलं असंही तो म्हणाला.

अलिकडेच सिद्धांतने 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या ऑडिशनचा एक किस्सा सांगितला. एका सिनेमासाठी सिद्धांत ऑडिशनसाठी गेला होता. मात्र, त्याच्या कुरळ्या केसांमुळे त्याला रिजेक्ट करण्यात आलं.

"मी माझ्या टॅलेंटच्या जोरावर ऑडिशनच्या फायनल राऊंडपर्यंत पोहोचलो होतो. पण, केवळ माझ्या लूककडे पाहून त्यांनी मला रिजेक्ट केलं. 'तुझे हे कुरळे केस या भूमिकेसाठी योग्य नाहीत. त्यामुळे आम्हाला वाटतंय तू पुन्हा कधीतरी नंतर प्रयत्न करावास', असं म्हणत त्यांनी मला रिजेक्ट केलं. पण, माझ्या केसांमुळे मला रिजेक्ट करणारे ते पहिले नव्हते. शाळेतही मला या गोष्टींचा सामना करावा लागलाय", असं सिद्धांत म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "शाळेतही मला अनेकदा मुलं सतत कुरळ्या केसांवरुन चिडवायचे. त्यामुळे लहानपणापासून मला लोकांचे टोमणे ऐकायची सवय झाली होती." दरम्यान, सिद्धांतने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'खो गए हम कहां' या सिनेमा नुकताच तो झळकला होता. त्यानंतर आता तो 'युधरा' या सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा