Join us

खरंच... तुझी प्रत्येक गोष्ट आवडते...! बायकोसाठी सिद्धार्थ चांदेकरची रोमॅन्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 2:57 PM

सिद्धार्थने मितालीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट इतकी रोमॅन्टिक आहे की, मिताली सुद्धा हुरळून जाईल.

ठळक मुद्दे  सिद्धार्थनं लिहिलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)आणि त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर ( Mitali Mayekar) हे दोघं सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर सिद्धार्थची ही पोस्ट वाचा. 

  तुझी प्रत्येक गोष्ट आवडते..., असे म्हणत सिद्धार्थने बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट इतकी रोमॅन्टिक आहे की, मिताली सुद्धा हुरळून जाईल. सिद्धार्थ लिहितो...

तुझी प्रत्येक गोष्ट आवडते...तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं. पाणी पिता पिता चुकून अंगावर सांडलं की एक केविलवाणा चेहरा करतेस...तो खूप आवडतो, तंद्रीत असताना काहीतरी विसरलेलं अचानक आठवतं तुला...ते सांगताना जो उत्साह असतो तो खूप आवडतो...कुणी तुझी मस्करी केली की, एक बिचारा रुसलेला चेहरा करते...तो तर खूप आवडतो. मी बोलत असताना टक लावून बघतेस तेव्हा शब्द विसरूनंच जातो एकदम...कारण बोलण्यापेक्षा ते डोळे बघत राहायला फार आवडंत. तुझ्याकडे पाहत बसलो असताना जेव्हा तू पकडतेस तेव्हा मान हळूच हलवून ‘काय रे?’ विचारतेस ना... ते तर फार आवडतं. खरं सांगू? तुझा चिडलेला चेहरा पण आवडतो. सॉरी पण रडताना पण सुंदर दिसतेस...तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं...साडी नेसून, टिकली वैगेरे लावून तर येऊच नको माझ्या , समोर बाकी कशातंच लक्ष लागत नाही. एवढं करून कशी दिसतेय मी? हे मला विचारतेस? कसं उत्तर देऊ गं... तुझे सगळे चेहरे आवडतात, सगळे डोळे आवडतात, खरंच...

 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर