सिद्धार्थ मल्होत्रा व परिणीती चोप्रा बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. ते दोघे बालाजी टेलिफिल्म्स व कर्मा मीडिया अँड एण्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'जबरिया जोडी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.जवळपास पाच वर्षानंतर सिद्धार्थ व परिणीती एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी दोघे २०१४ साली प्रदर्शित झालेला हसी तो फसी चित्रपटात झळकले होते.
'जबरिया जोडी' चित्रपट जबरदस्तीने होणाऱ्या लग्नावर आधारीत आहे. हा सिनेमा १७ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश होईल म्हणून 'जबरिया जोडी'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
आधी या सिनेमाचे नाव 'शॉटगन शादी' असे ठेवण्यात येणार होते मात्र नंतर काही तरी बदल झाल्याने सिनेमाचे नाव जबरिया जोडी ठेवण्यात आले. फर्स्ट लूकमध्ये सिनेमाची थीम स्पष्ट होतेय. हा सिनेमा बिहारमध्ये सध्या चालत असलेल्या बळजबरी विवाह करून देण्याच्या म्हणजेच 'पकडूआ शादी' ह्या प्रथेवर आधारित आहे. ह्या सिनेमासाठी एकताने सिद्धार्थला बॉडी बनवण्याचा सल्ला दिला आहे. या भूमिकेसाठी परिणीतीच्या आधी श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते. मात्र तिने नकार दिला.