Join us

Siddharth Kiara Wedding : नवरी नटली अन् मंडपही सजला, सिद्धार्थ-कियारा आज लग्नबंधनात अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 9:00 AM

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. 

Siddharth Kiara Wedding : बॉलिवूडचे लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहेत. या आलिशान महालात दोघेही नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकतील. या बिग फॅट वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. 

काल ६ फेब्रुवारी रोजी मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. संगीत नाईटसाठी सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगाने चमकला होता. पॅलेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आलिशान विवाहसोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारही पोहोचले आहेत. 

मंडप सजला आहे, हातावर मेहंदी लागली आहे. काही तासातच किआरा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार आहेत. शाही अंदाजात ते नातेवाईकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील. 

ईशा अंबानीचीही लग्नासाठी उपस्थित

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसबाहेर शस्त्रांसह सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. स्पेशल सिक्युरिटीही तैनात करण्यात आली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे कियाराची बालपणीची मैत्रीण आणि मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. ईशा कियाराची लहानपणीपासूनची खास मैत्रीण आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी ईशा जैसलमेरला पोहोचली आहे. यासाठीच कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :लग्नबॉलिवूडसिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी