Mission Majnu : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Siddharth Malhotra) 'मिशन मजनू' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोल होत आहे. पाकिस्तान मधील लोकांनी सिनेमात अशा काही चुका काढल्या आहेत की ते सिनेमावर हसत आहे. याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
'मिशन मजनू' मध्ये अनेक सीन्समध्ये उर्दू भाषेचा वापर केला आहे किंवा उर्दू भाषा लिहिलेली आहे. मात्र ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आल्याने आता चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. पाकिस्तानी युझर्सने ट्विटरवर मिशन मजनूला ट्रोल (Troll) करण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूडला धड उर्दू टाईपही करता येत नाही अशा शब्दात बॉलिवूडची खिल्ली उडवली जात आहे.
सिनेमातील एका सीन मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मशिदीत एका व्यक्तीशी बोलत असतो. मशिदीत एक साईन बोर्ड आहे ज्यावर उर्दू भाषेत लिहिलेलं आहे. यूझर्स म्हणतात, यावर लिहिलेले शब्द चुकीचे आहेत. याचा विचित्र आणि चुकीचा अर्थ निघत आहे. फिल्ममेकर्सने उर्दु भाषेचा अनुवाद करण्यासाठी गुगल ट्रान्स्लेटचा वापर केल्याचं दिसतंय असंही एका युझरने म्हणलं आहे.
एका युझरने सिनेमातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. यात पाकिस्तानमध्ये एक ट्रेन उभी आहे. ट्रेनच्या गेटजवळ उर्दू भाषेत 'प्रवेश' असे लिहिले आहे. पण याचं स्पेलिंग चुकीचं आहे. युझरने फोटो ट्वीट करत लिहिले, 'आमच्या क्रिकेटरची खिल्ली उडवता आणि यांचे असे हाल आहेत.' आणखी एकाने लिहिले,'निर्मात्याकडे दोन डॉलर आणि एक स्वप्न होतं. त्याने काहीच विचार केला नाही, रिकाम्या डोक्याने सिनेमा बनवला.'
'मिशन मजनू' हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धावर आधारित आहे असून ही स्पाय फिल्म आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबतच रश्मिका मंदाना, परमीत सेठी, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. शांतनु बागची यांची सिनेमा दिग्दर्शित केला आहे.