बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty)ची आगामी सीरिज 'इंडियन पुलिस फोर्स'ची प्रत्येक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी रोहित शेट्टीने अखेर आज त्याची बहुप्रतीक्षित वेबसीरिज इंडियन पुलिस फोर्स(Indian Police Force)चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सीरिजमध्ये रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय अॅक्शन अवतारात दिसत आहेत.
रोहित शेट्टीने आज इंडियन पुलिस फोर्सचा दमदार टीझर रिलीज केला आहे आणि हा टीझर शेअर करत लिहिले की, ही माझ्यासाठी घरवापसी आहे! कार, पोलिस, अॅक्शन, हाय व्होल्टेज ड्रामा आणि डायलॉग्ज बॅक टू बेसिक!!!"
टीझरची सुरुवात बीपच्या आवाजाने होते. यानंतर टीझर दिल्लीच्या अनेक रस्त्यांवरून जातो, प्रत्येक फ्रेम बॉम्बवरील घड्याळाच्या टिकटिक प्रमाणे सस्पेन्स वाढवते आणि नंतर स्फोट होतो. यानंतर, या पोलिस नाटकातील धाडसी नायक सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा पोलिसांच्या गणवेशात धडाकेबाज एंट्री करतात जे बॉम्बस्फोटामागील सूत्रधार शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीझरमध्ये देशप्रेमाची भावनाही दिसून येत आहे, तर भावनेची झलक आणि भरपूर अॅक्शनही आहे. एकंदरीत 'इंडियन पुलिस फोर्स' या मालिकेचा टीझर तुम्हाला थक्क करणारा आहे.
'इंडियन पुलिस फोर्स' ही सात भागांची मालिका आहे.रोहित शेट्टी आणि सुशांत प्रकाश दिग्दर्शित,'इंडियन पुलिस फोर्स' ही सात भागांची अॅक्शन-पॅक मालिका आहे. वेबसीरिज हा कर्तव्य बजावणाऱ्या देशभरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवा, बिनशर्त बांधिलकी आणि उत्कट देशभक्तीला मनापासून आदरांजली आहे. आपल्याला सुरक्षित ठेवत. कामगिरी करताना त्यांनी सर्वस्व पणाला लावले.
'इंडियन पुलिस फोर्स' कधी आणि कुठे पाहायला मिळणार?रोहित शेट्टीने देखील 'इंडियन पुलिस फोर्स' डिजिटल पदार्पण करत आहे. या मालिकेत सिद्धार्थ मल्होत्रा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर शिल्पा शेट्टी कुंद्रा, विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंग, मुकेश ऋषी, ललित परीमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज १९ जानेवारी २०२४ रोजी प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे.