टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला. अजूनही त्याचे सहकलाकार आणि चाहते त्याच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सोशल मीडियावर ते त्याच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. दरम्यान सिद्धार्थ आधीपासून त्याच्या मेडिकल कंडिशनमुळे त्रस्त होता. बिग बॉस शोमध्ये त्याने याबाबतचा खुलासा केला होता.
बिग बॉसच्या १३व्या सीझनमधील एका भागात जेव्हा शेफाली जरीवाला आणि विशाल आदित्यसोबत सिद्धार्थ गप्पागोष्टी करत बसला होता, तेव्हा त्याने त्याच्या स्मोकिंगच्या व्यसनाबद्दल सांगितले होते.
सिद्धार्थने दोघांना सांगितले होते की, 'जेव्हा मी या शोमधून बाहेर पडेन, तेव्हा सर्वप्रथम मी लंग क्लीनिंग ट्रीटमेंटसाठी जाणार आहे. त्यानंतर शेफाली जरीवालाने त्याला विचारले की मुंबईतच उपचार घेणार का? तर त्यावर सिद्धार्थने उत्तर दिले की ट्रिटमेंट इथेही होऊ शकेल पण मी यासाठी लंडनला जाणार आहे. कारण तिथे ही ट्रिटमेंट चांगली होते. त्यानंतर माझे सर्व डार्क कार्बन काढून टाकले जाईल. तिथे लंग्स ट्रांसप्लेंट सुद्धा केले जाते पण त्यात काट-छाट केली जाते म्हणून ही ट्रिटमेंटच माझ्यासाठी योग्य आहे. मात्र दुर्देवाने सिद्धार्थची ही इच्छा पूर्ण होण्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला.