Join us

हा अभिनेता आणि अभिनेत्री फिरले मुंबईच्या रस्त्यावर, कोणीच त्यांना ओळखले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:10 PM

या कलाकारांनी नुकतेच मुंबईत त्यांच्या एका आगामी चित्रपटासाठी चित्रीकरण केले.

ठळक मुद्देसिद्धार्थ मल्होत्राने कुर्ता आणि पायझमा घातला होता तर डोक्यावर टोपी घातली होती तर रश्मिका साध्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसली. या चित्रपटाची कथा ही सत्तरीच्या दशकातील आहे.

मिशन मंजू या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्या दोघांनी मुंबईच्या रस्त्यावर या चित्रपटाचे चित्रीकरण केले असून एका जुन्या स्कूटरवरून ते फिरताना दिसले.

सिद्धार्थ मल्होत्राने कुर्ता आणि पायझमा घातला होता तर डोक्यावर टोपी घातली होती तर रश्मिका साध्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसली. ईटाइम्सने हे एक्सक्ल्यूझिव्ह फोटो काढले आहेत. मिशन मंजू या चित्रपटाची कथा ही सत्तरीच्या दशकातील आहे. सत्तरीच्या दशकात घडलेल्या एका खऱ्या घटनेवर हा चित्रपट आधारित असून भारत-पाकिस्तान मध्ये घडलेली ही घटना आहे. या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.

मिशन मंजू या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अंजनी पुत्र या कन्नड चित्रपटामुळे रश्मिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तसेच शंतनू बांची मिशन मंजू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून कोणताही चित्रपट दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

या चित्रपटाविषयी सिद्धार्थने सांगितले होते की, ज्या मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानचे नाते पूर्णपणे बदलले, त्याची आठवण करून देणाऱ्या चित्रपटाचा मी भाग होतोय याचा मला आनंद आहे. हा एक खास चित्रपट लोकांसमोर मांडायला मी उत्सुक आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर २३ डिसेंबरला लाँच करण्यात आले. 

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन 'मिशन मजनू' हा चित्रपट तयार करणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रा