Join us

कियाराचं सिद्धार्थसोबत लिपलॉक; 'हॅपी बर्थडे माय लव्ह...' म्हणत शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 18:12 IST

कियाराने सिद्धार्थला रोमँटिक स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 बॉलिवूडचा 'शेरशाह' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. लग्नानंतर सिद्धार्थचा कियारासोबतचा हा पहिला वाढदिवस आहे. कियाराने सिद्धार्थला रोमँटिक स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कियाराने रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.  ज्यामध्ये सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना लिपलॉक किस करताना दिसत आहेत. 

कियाराने सिद्धार्थच्या अनोख्या स्टाईलचा वाढदिवसाचा केकची झलकही चाहत्यांना दाखवली.  ज्यामध्ये सिद्धार्थचं मिनिएचर आहे. तसेच केकसोबतच सिद्धार्थच्या चित्रपटातील पात्राची रीलही जोडण्यात आली. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सिद्धार्थने रेम्बो रंगाचा टी-शर्ट तर कियारानं काळ्या रंगाचा ड्रेस  परिधान केल्याचे दिसून आलं. तर व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं, 'हॅपी बर्थडे माय लव्ह' असं लिहलं. 

सिद्धार्थ मल्होत्राने हिंदी चित्रपटसृष्टीत 11 वर्षे पूर्ण केली असून आज त्यांचा 39 वा वाढदिवस आहे. सिद्धार्थचा हा वाढदिवस त्याच्या मित्रपरिवाराने खास बनवला. बॉलिवूडमधील काही जवळचे मित्र सिद्धार्थच्या घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. तर कियाराचे आई-वडीलही त्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. तर सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीमध्ये करण जोहरही उपस्थित होता.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ मल्होत्रा ​​'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सिरीजद्वारे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ही सीरिज १९ जानेवारीला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये त्यासोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय देखील दिसणार आहेत. तर कियारा अलीकडेच कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता कियारा लवकरच 'गेम चेंजर' चित्रपटात राम चरणसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्राबॉलिवूडसेलिब्रिटी