बॉलिवूडचा हँडसम अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. फार कमी कालावधीत सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत सिद्धार्थने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. सिद्धार्थच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज यशाच्या शिखरावर असलेल्या सिद्धार्थला इंडस्ट्रीत येण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली होती. आज कोट्यावधीमध्ये कमावणाऱ्या सिद्धार्थची पहिली कमाई किती होती, याचा खुलासा त्याने केला आहे.
सध्या सिद्धार्थ त्याच्या योद्धा सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या प्रमोशनासाठी विविध ठिकाणी तो मुलाखती देत आहेत. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने स्ट्रगलिंगच्या दिवसांवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'मी या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत होता, तेव्हा सॅमसंगच्या एका कॅम्पेनमध्ये काम केलं होतं. तेव्हा मला माझा पहिला पगार मिळाला होता. तो फक्त दोन ते तीन हजार रुपये इतकाच होता'.
सिद्धार्थने चार वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर हे सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला पुढे अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्यासाठी तो दिल्लीतून मुंबईत आला. एका मुलाखतीत सिद्धार्थने सांगितलेलं, की शाळेनंतर कॉलेजमध्ये गेलो, त्यावेळी भावाप्रमाणेच आपणही MBA करुन फायनान्समध्ये नोकरी करायचं ठरवलं होतं. पण कॉलेजमध्ये गेल्यावर मॉडेलिंगमध्ये आवड निर्माण झाली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये येण्याचं ठरवलं.
सिद्धार्थने वयाच्या १८व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरू केलं होतं. सुरुवातीला सिद्धार्थने त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी मॉडेलिंगची सुरुवात केली होती. मॉडेलिंगसाठी त्याची कमाई सात हजार रुपये होती. त्यानंतर सिद्धार्थनं अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं. त्यासाठी तो दिल्लीतून मुंबईत आला होता. सिद्धार्थने छोट्या पडद्यापासून अभिनय करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ याने 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' मालिकेतून झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर सिद्धार्थ याने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यााच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर सिद्धार्थने करण जोहर दिग्दर्शित 'स्टूडेंट ऑफ द ईयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिलं नाही.