सध्या आलिया भट्टरणबीर कपूरच्या प्रेमात आहे. कधीकाळी हीच चुलबुली आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमात होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. आता तर सिद्धार्थ व आलिया दोघेही आपआपल्या वाटेने बरेच पुढे निघून गेले आहेत. खरे तर सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले.
आलियानंतर सिद्धार्थ जॅकलिन फर्नांडिसला डेट करतोय, अशी चर्चा होती. मध्यंतरी तो कियारा अडवाणीला डेट करतोय, असेही ऐकिवात आले. पण सिद्धार्थने या दोन्ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. मी कुणालाच डेट करत नाहीये. सध्या मी सिंगल आहे. जॅकलिनसोबत वेळ घालवणे मला आवडते. पण मी कधीच तिला डेट केले नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. कियाराबद्दलही असे काहीही नाही. मीडियात ज्या काही चर्चा होतात, त्या प्रत्येकवेळी खऱ्या असतातचं असे नाही, असे तो म्हणाला.