Join us

‘शेरशाह’ चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रासाठी  गेम चेंजर ठरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 11:51 AM

Shershaah : ‘शेरशाह’ या चित्रपटात सिद्धार्थ यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा त्याच्या नावीन्यपूर्ण  भूमिकेत दिसणार आहे

ठळक मुद्देअमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि धर्मा प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने अमेझॉन ओरिजिनल मूव्ही ‘शेरशाह’ चा प्रीमियर जागतिकरित्या 12 ऑगस्ट 2021 रोजी होईल.

 सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) इंडस्ट्रीतील सर्वाधिक आश्वासक अभिनेत्यांपैकी एक आहे.  नुकताच ‘शेरशाह’चा (Shershaah) ट्रेलर रिलीज झाला आहे आणि यात सिद्धार्थ  यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अशा त्याच्या नावीन्यपूर्ण  भूमिकेत दिसणार आहे. कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) च्या कथेवर आधारित ‘शेरशाह’  चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना बघून हा चित्रपट नक्कीच सिद्धार्थसाठी गेम चेंजर ठरेल याची शक्यता नाकारता येत नाही.  

ही कथा विक्रम बत्राच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्याच्या  व्यावसायिक आयुष्याच्या प्रवासापर्यंत घेऊन जाते.  अभिनेता सिद्धार्थचे नाव  या चित्रपटामुळे अव्वल लिस्ट मध्ये  प्रवेश  करण्याची शक्यता आहे कारण त्याने तरुण रोमँटिक युवक  आणि अँक्शन  वॉर हिरो अशा दोन्ही भूमिका  एकाच चित्रपटात  साकारून प्रभावित केल्याचे दिसून येत आहे.  धर्मा प्रॉडक्शन्सचा हा  चित्रपट या स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणा-या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

शेरशाह!  कॅप्टन बत्रांची भूमिका साकारणं सोपं नव्हतं, पण सिद्धार्थ मल्होत्रानं करून दाखवलं...!

या वर्षीचा स्वातंत्र्य दिन शौर्य, प्रेम आणि त्यागाच्या अविश्वसनीय कथेचा साक्षीदार असेल. विष्णु वर्धन दिग्दर्शित, धर्मा प्रॉडक्शन आणि काश एंटरटेनमेंटद्वारे संयुक्तपणे निर्मित, ‘शेरशाह’ कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) च्या जीवनावर आधारित आहे.  या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा  आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि धर्मा प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने अमेझॉन ओरिजिनल मूव्ही ‘शेरशाह’ चा प्रीमियर जागतिकरित्या 12 ऑगस्ट 2021 रोजी होईल.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रा