Join us

अलविदा 'सिड' !! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला सिद्धार्थ शुक्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 1:48 PM

Sidharth Shukla Passes Away : आईसोबत एअरपोर्टवर अखेरचा दिसला होता सिद्धार्थ, फोटो व्हायरल

ठळक मुद्देआपल्या करिअरमध्ये सिद्धार्थने फार कमी वेळात मोठी उंची गाठली होती. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा तो मालक होता.  

चाहत्यांचा लाडका सिड अर्थात सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla ) अकाली गेला. वयाच्या उण्यापु-या 40 व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली.आज गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.   मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थचा अकाली मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला. अद्यापही सिड आपल्यात नाही, यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये.सिद्धार्थला मॉडेलिंगमध्ये काहीही रस नव्हता. तो या क्षेत्रात आला तो केवळ आणि केवळ आईच्या हट्टामुळे. सिद्धार्थला एक मोठा बिझनेसमॅन व्हायचे होते. पण लेकाचा चेहरा अगदी हिरोसारखा आहे, त्यामुळे त्याने मॉडेलिंग करावी, अभिनय करावा, अशी आईची इच्छा होती. आईच्या इच्छेखातर सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याने ही स्पर्धा जिंकली. इथूनच सिद्धार्थच्या मॉडेलिंग करिअरचा प्रवास सुरू झाला होता. तो अगदी कालपर्यंत सुरू होता.

मॉडेलिंग, जाहिराती करता करता त्याला ‘बाबुल का आंगन छुटे ना’ हा पहिला टीव्ही शो मिळाला आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून बघितले नाही. बालिका वधू या मालिकेने सिद्धार्थ घराघरात लोकप्रिय झाला. यानंतर बॉलिवूडमध्येही त्याचा डेब्यू झाला. रिअ‍ॅलिटी शो जिंकण्यात तर जणू त्याचा हातखंडा होता. बिग बॉस 13 शिवाय खतरों के खिलाडी 7 चा तो विजेता होता.

आपल्या करिअरमध्ये सिद्धार्थने फार कमी वेळात मोठी उंची गाठली होती. कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा तो मालक होता.   2020 पर्यंत सिडची एकूण संपत्ती 1.5 मिलिअल डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी 94 लाख 55 हजार 750 रुपये इतकी होती.  सिद्धार्थ शुक्लाची बहुतेक कमाई ही टीव्ही-शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून होत होती.  सिद्धार्थचे मुंबईत घर आहे. इथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याने हे घर नुकतेच विकत घेतले होते. बाईक आणि कारचे प्रचंड वेड असलेल्या सिद्धार्थ बीएमडब्ल्यू 5 या अलिशान गाडीतून फिरायचा. हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब बाईकवरही तो दिसायचा.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्ला