बिग बॉस 13 जिंकल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाची (Sidharth Shukla ) फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली. आता काय तर त्याचे देशभर चाहते आहेत. तूर्तास मात्र हाच सिद्धार्थ शुक्ला ट्रोल होतोय. होय, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट त्याने केली. पण दु:ख व्यक्त करण्याचा त्याचा अंदाज नेटक-यांना भावला नाही. मग काय, नेटक-यांनी त्याला ट्रोल करणे सुरू केले.
इन्स्टाग्रामवर सिद्धार्थने एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला. या फोटोत सिद्धार्थ डोक्याला हात लावून खिन्न व उदास चेह-याने बसलेला दिसतोय. ‘ अफगाणिस्तानमधली परिस्थिती पाहून खूप हताश झालोय. खरंच माणूसकी जिवंत आहे का?’, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
सिद्धार्थने यापद्धतीने अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर दु:ख व्यक्त करणे अनेकांना खटकले. अनेकांनी यावरून त्याला लक्ष्य केले. इथेही नाटक सुरू? असा संतप्त प्रश्न एका युजरने हा फोटो पाहून केला. पोज देऊन दु:ख कशासाठी? सहानुभूती दाखवायचीच तर त्या पद्धतीने व्यक्त कर ना, ही फालतुगिरी कशासाठी? असा सवाल एका युजरने केला. इतके दु:ख झालेय तर एखादे ट्विट करू शकला असता, दु:खी फोटो अन् कॅप्शनची काय गरज होती? असे एका अन्य युजरने लिहिले.अर्थात अनेक चाहत्यांनी सिद्धार्थला पाठींबाही दिला. ‘काही कलाकार अशा मुद्द्यावर एक अक्षरही बोलत नाही. पण तू नेहमीच सत्याच्या बाजुने असतोस,’ अशा कमेंट्स करत त्याचे फॅन्स त्याचा बचाव करताना दिसले.