Sidhu Moose Wala Murder : पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि कॉंग्रेस नेता शुभदीप सिंह उर्फ सिद्धू मूसेवालाची रविवारी काही लोकांनी मिळून गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. सिद्धूच्या मृत्यूला संयोग म्हणा की नियती तो बालपणापासून ज्या कलाकाराला आपला आदर्श मानत होता. सिद्धूला पैसा आणि मृत्यूही तसाच मिळाला.
सिद्धूला बालपणापासूनच अभ्यासापेक्षा संगीतात जास्त इंटरेस्ट होता. पंजाबी स्टीरिओटाइप तोडत तो शाळेत असतानापासूनच इंग्लिश रॅप आणि हिपहॉप म्युझिकच्या जवळ आला होता. यादरम्यान अमेरिकन रॅपर टुपॅक शकुरच्या (Tupac Shakur Murder) गाण्यांनी सिद्धूच्या मनावर मोठी छाप पाडली. सिद्धू टुपॅकची गाणी ऐकत होता आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू सिद्धूने टुपॅकची स्टाइल कॉपी करणं सुरू केलं आणि पंजाबीत गाणी कंपोज केली.
टुपॅकचं नाव जगातल्या सर्वात बेस्ट रॅपरमध्ये घेतलं जात होतं. त्याच्या गाण्यांमधून सामाजिक मुद्द्यांची झलकही बघायला मिळत होती. त्याची अनेक गाणी सुपरहिट झाली होती. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, टुपॅकचा मृत्यूही सिद्धू मूसेवालाप्रमाणेच झाला होता.
टुपॅक आणि सिद्धू मूसेवालाची गायकी आणि सक्सेस लाइफ जेवढी मिळती जुळती आहे तेवढात दोघांचा मृत्यूही वेदनादायी झाला. ७ सप्टेंबर १९९६ मध्ये लॉस एंजलिसमध्ये एका अज्ञात हल्लेखोराने कारमध्ये बसलेल्या टुपॅकवर गोळी झाडून त्याची हत्या केली होती. टुपॅक केवळ २५ वर्षांचा होता. या घटनेच्या जवळपास २५ वर्षांनंतर पंजाबच्या मानसा जिल्ह्यात तशीच एक घटना घडली. यावेळी निशाण्यावर सिद्धू मूसेवाला होता.
सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याचं शेवटचं गाणं 'द लास्ट लाइड' सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे गाणं ऐकल्यावर तर असं वाटतं की, सिद्धूला त्याचं भविष्य माहीत होतं. या गाण्यात सिद्धूने तरूणीपणीच मृत्यूबाबत उल्लेख केला आहे. गाण्यात सिद्धू म्हणाला की, 'जवानी मे ही जनाजा उठेगा'.