उरी फेम अभिनेता विकी कौशलचे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले. आधी त्यांच्या अफेयरची आणि नंतर त्यांच्या ब्रेकअपची खूप चर्चा झाली. नुकतेच हरलीने ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. ती म्हणाली की, जे काही झाले ते चांगलेच झाले.
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, हरलीनने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने विकी कौशलसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.
हरलीन म्हणाली की, खरे सांगू मला या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. मात्र माझे कुटुंब व मित्रांना खूप त्रास झाला. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख असते. या गोष्टीमुळे मी स्वत:ला कमी लेखत नाही आहे. मी एका स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि मी आतापर्यंत एकही सिनेमा केलेला नाही यामुळे मी अजिबात स्वत:ला कमी लेखत नाही. मी स्वत:वर प्रेम करते. मला लोकांनी हरलीन सेठी म्हणूनच ओळखावे. त्यामुळे एखाद्याला माझा एक्स बॉयफ्रेंड म्हणणे चुकीचे ठरेल.
तर काही दिवसांपूर्वी अभिनेता विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो सिंगल आहे. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की तो सिंगल आहे का? यावर तो म्हणाला, हो मी सिंगल आहे. ब्रेकअप होण्याआधी विकीने अनेक मुलाखतीत आपल्या रिलेशनशिपबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. त्याने कॉफी विथ करणमध्येही रिलेशनशीपबद्दल सांगितले होते.
तर हरलीन सेठी काही महिन्यांपूर्वी वेब सीरिज ब्रोकन अँड ब्युटिफूलमध्ये दिसली होती. यातील तिच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते.