90 च्या दशकात रागेश्वरी लूंबा (Raageshwari Loomba) सिनेमा आणि संगीताच्या विश्वास चांगली प्रसिद्ध होती. तिने सैफ अली खान आणि सुनील शेट्टीची अभिनेत्री म्हणूनही काम केलं होतं. त्यावेळचे लोक तिच्या गायकीचे आणि सौंदर्याचे फॅन्स होते. बालपणी रागेश्वरी तिच्या मित्रांमध्ये 'राग्ज' नावाने प्रसिद्ध होती. बालपणापासूनच रागेश्वरीला शोबिज आणि ग्लॅमर इंडस्ट्रीची आवड होती. कमी वयातच तिने मॉडलिंग सुरू केली होती. 22 व्या वयात रागेश्वरीने पहिला अल्बम 'दुल्हनिया' काढला होता. ज्यात तिने अभिनयही केला होता. त्यानंतर ती रातोरात स्टार बनली होती.
रागेश्वरीचा पहिला सिनेमा 'ऑंखे' होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ती 'मैं खिलाड़ी तु अनाड़ी' मध्ये अक्षय कुमारची बहीण आणि सैफ अली खानची हिरोईन होती. तिचं क्यूटनेस आणि सौंदर्य सिनेमात पसंत करण्यात आलं होतं.
90च्या काळातील ती सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. रागेश्वरी आपल्या यशाला एन्जॉय करत होती आणि आपल्या शोजसाठी देश-विदेशात प्रवास करत होती. ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हाच तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. तिच्या चेहऱ्याला पॅरालिसीस गेला होता. त्यानंतर तिचं विश्वच बदललं.
एक दिवस ती अचानक उठली आणि तिला तिच्या चेहऱ्यात बदल दिसला. डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा चेहरा आणि चेस्टचा अर्ध भाग सुन्न झाला आहे. ती बोलूही शकत नव्हती. तिने थेरपी आणि योगाची सुरूवात केली. उपचारानंतर ती बरी झाली. रागेश्वरी बरी झाली, पण तिचं गाणं सुटलं.
2012 मध्ये रागेश्वरी लूंबाने सुधांशु स्वरूपसोबत लग्न केलं. तिच्या आई-वडिलांनी हे लग्न जुळवलं होतं. सुधांशु व्यवसायाने एक वकिल आहे आणि लंडनमध्ये राहतो. लग्नाच्या चार वर्षानंतर ती आई झाली. ती आता संसारात आनंदी आहे. सोशल मीडियावर रागेश्वरी फॅन्ससोबत जुळलेली आहे. सोशल मीडियावर ती तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. अजूनही ती तशीच आधीसारखी सुंदर दिसते.