Join us

मुंबईच्या बिल्डरांनी अनुराधा पौडवाल यांना लावला लाखोंचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 18:59 IST

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना मुंबईच्या बिल्डर्सनी ४० लाखांनी चुना लावला.  मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सात बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना मुंबईच्या बिल्डर्सनी ४० लाखांनी चुना लावला.  मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सात बिल्डर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजू सुलेरे आणि अविनाश धोले असे मुख्य आरोपींची नावे आहेत. उर्वरित पाचजण या दोघांचे पार्टनर आहेत़ या सर्वांचे ओम मंदार रिएल्टर्स नावाचे फर्म आहे. या फर्मकडून अनुराधा पौडवाल  यांनी ४० लाखांत एक फ्लॅट खरेदी केला होता. पण नंतर बिल्डरने बनावट कागदपत्रे बनवून हाच फ्लॅट आणखी ब-याच जणांना विकल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अनुराधा पौडवाल यांनी पोलिसांत धाव घेतली.या वृत्ताला दुजोरा देताना अनुराधा यांनी सांगतले की, आम्ही गुंतवणूकीसाठी २०१३ मध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. पण नंतर आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :अनुराधा पौडवाल