ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद रूग्णालयात भरती, बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 10:19 AM2022-04-15T10:19:51+5:302022-04-15T10:22:15+5:30

Singer Asha Bhosale Son Anand Admitted : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद यांना दुबईच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तथापि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Singer Asha Bhosale Son Anand Admitted In dubai Hospital | ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद रूग्णालयात भरती, बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद रूग्णालयात भरती, बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले

googlenewsNext

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale ) यांचा मुलगा आनंद (Anand Bhosale ) यांना दुबईच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तथापि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दुबईत आनंद यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलविण्यात आलं. सुरूवातीला त्यांनी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. प्रकृती धोक्याबाहेर असल्यानं तूर्तास त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं असल्याचं कळतंय. आशा भोसले यावेळी आनंद यांच्यासोबतच आहेत.

अचानक बेशुद्ध पडले...
ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. आनंद अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. यादरम्यान त्यांना किरकोळ इजा झाली. यामुळे मंगेशकर व भोसले कुटुंब घाबरलं. आनंद यांना त्वरित रूग्णालयात भरती करण्यात आलं. आनंद यांना रूग्णालयातून कशी सुट्टी मिळेल, हे अद्याप समजलेलं नाही. 
आशा भोसले यांनी तीन मुलं होती. यापैकी सर्वात मोठा मुलगा हेमंत भोसले आणि मुलगी वर्षा भोसले आज या जगात नाहीत. हेमंत भोसले यांचे सप्टेंबर 2015 मध्ये कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले. तर मुलीने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

Web Title: Singer Asha Bhosale Son Anand Admitted In dubai Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.