Join us

जुईलीने शेअर केला नवरा रोहित राऊतसोबतचा बेडरूम व्हिडीओ, चाहत्यांनी अशा केल्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 10:15 AM

Rohit Raut Juilee Joglekar video : गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर गेल्या 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. गेल्या 23 फेब्रुवारीला या लग्नाला महिना पूर्ण झाला. त्यादिवशीचा काय सीन होता?

Rohit Raut Juilee Joglekar video : गायक रोहित राऊत (Rohit Raut)आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) गेल्या 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील  ढेपे वाड्यात थाटामाटात हा लग्नसोहळा संपन्न झाला होता. गेल्या 23 फेब्रुवारीला या लग्नाला महिना पूर्ण झालाये. लग्नाला महिना पूर्ण झाला त्यादिवशीचा काय सीन होता. तर रोहित मस्तपैकी झोपेत होता आणि जुईली अगदी प्रेमाने त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होती. जुईलीने याचा बेडरूममधील व्हिडीओ शेअर केला आहे आणि तो प्रचंड व्हायरल होतोय. जुईली रोहितला उठवायचा प्रयत्न करत आहे. यावर रोहित फक्त दोन मिनिट म्हणतो आणि नंतर परत झोपतो. त्याला पाहून जुईलीला हसू आवरत नाही.  

जुईलीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘रोहित दादा ऊठ नाहीतर काठीने मारून काढेल जुईली ताई..’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर तर दुसऱ्याने,‘बायको उठवतेय प्रेमाने तर ऊठ,’ असं म्हटलं आहे. काहींनी मात्र झोपू दे त्याला, म्हणत रोहितची बाजू घेतली आहे. 

जुईली ही सुद्धा लोकप्रिय गायिका आहे. सोशल मीडियावर सुद्ध तिचा मोठा चाहता वर्ग  आहे. जुईलीचे यूट्यूब चॅनल देखील आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रोहित तर तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. रोहित देखील सोशल मीडियावर सक्रिय असतो.

 

रोहित व जुईली 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. रोहितची पत्नी जुईली ही सुद्धा गायिका आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. 2009 साली झी मराठीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन भेटीला आला होता. रोहित राऊत या पहिल्या सीझनचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर ही देखील स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले आणि मग प्रेमात. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

टॅग्स :रोहित राऊत