प्रसिद्ध गायक KK यांच्या निधनामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच जबर धक्का बसला आहे. लाइव्ह कॉनर्स्ट सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. यात काही गोष्टींचा उलगडादेखील होत आहे. अशामध्येच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांसमोर लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या केके यांना कॅमेराची भीती वाटायची अशी चर्चा होत आहे. याविषयी खुद्द केके यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
कॅमेरापासून दूर पळायचे केके
केके यांना 'आजतक'ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये याविषयी खुलासा केला होता. 'कॅमेरा पाहून तुम्ही दूर पळता मग लाइव्ह कॉनर्स्ट कसा काय करता?' असा प्रश्न केके यांना विचारण्यात आला होता. त्यावर "कॅमेरा पाहिल्यावर माझा जीव घाबराघुबरा होता. लाइव्ह कॉनर्स्टमध्ये सुद्धा कॅमेरा सतत तुमच्यावर फोकस करुन असतो. पण, मी एकदा गाणं सुरु केलं की मला सगळ्याचा विसर पडतो. माझ्यासमोर कॅमेरा आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही", असं केके म्हणाले होते.
दरम्यान, केके यांनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ अशा कितीतरी भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. केके यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीच्या झिंगलपासून केली होती. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये त्यांचा पहिला म्युझिक अल्बम लॉन्च केला. तसंच त्यांनी अभिने चित्रपटांनाही त्यांचा आवाज दिला. यात हम दिल दे चुके सनम चित्रपटातील 'तड़प तड़प', 'अपाडी पोडु', 'डोला रे डोला', 'क्या मुझे प्यार है', 'वो लम्हे... ', 'आंखों में तेरी', 'खुदा जाने', 'पिया आए ना', 'मत आज़मा रे', 'इंडिया वाले' आणि 'तू जो मिला' या गाण्यांचा समावेश आहे.