पॉप सिंगर लेडी गागा आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे कायम चर्चेत असते. आज लेडी गागाचे जगभर चाहते आहेत. पण याच लेडी गागाला करिअरच्या सुरूवातीला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ‘ए स्टार इज बॉर्न’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी लेडी गागा बोलत होती. सिंगींगसाठी स्वत:ला तयार करत असताना अनेकांनी मला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. सुंदर दिसण्यासाठी हे गरजेचे आहे, असे मला अनेकांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण मी ही सर्जरी करण्यास नकार दिला. मी जशी आहे, तशी लोकांनी मला स्वीकारावे, असेच मला वाटे, असे लेडी गागा म्हणाली.
मी कधीच अभिनेत्री बनू शकणार नाही, असे एकेकाळी मला वाटायचे. कारण आॅडिशनच्यावेळी नेमका माझा अभिनय बिघडायचा, असेही तिने सांगितले. लेडी गागाच्या गाण्यावर १९८०-९० च्या दशकातील इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आहे. लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली. ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान पटकावणाऱ्या गागाकडे सौंदर्य, कमनीय देह इत्यादी वैशिष्ट्ये नसली, तरीही आत्मविश्वास, शब्दसंपदा आणि खणखणीत आवाज यांची तिच्याकडे कमतरता नव्हती. सुरुवातीला पॉपस्टारांसाठी गाणी लिहिता लिहिता तिला आपल्या आवाजातले गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली.