Join us

गायिका नेहा राजपाल आणि गायक हर्षवर्धन वावरे आले 'या' गाण्यासाठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:28 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल व गायक हर्षवर्धन वावरे एकत्र अले असून त्यांचे बेधुंद हे मराठी रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल व गायक हर्षवर्धन वावरे एकत्र अले असून त्यांचे बेधुंद हे मराठी रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. रोहितराज तुकाराम कांबळे प्रथमच दिग्दर्शक करत असून, प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि गायक हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं उत्कृष्टरित्या गायले आहे.  या गाण्याचे रेकॉर्डिंग ठाण्याच्या सीएनएम म्युझिक फॅक्टरी या स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याची विशेषता म्हणजे संपूर्ण तरुण टीम यासाठी काम करत असून, हे गाणे एकूण प्रेमात पुन्हा बेधुंद होता येणार आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=866891783745121&id=100012729220603

या अल्बम संदर्भात बोलताना गायिका नेहा राजपाल हिने सांगितले की, गायक हर्षवर्धन वावरे सोबत प्रथमच हा अल्बम करतेय. बेधुंद हे प्रेमावर आधारित गाणं आहे. प्रेमाच्या अशा फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्ड होत असल्याने गाणं गाताना एक वेगळीच मजा आली आहे. त्यामुळे हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल. हर्षवर्धन वावरे या संदर्भात म्हणाला की, गायिका नेहा राजपाल सोबत हा अल्बम गाण्याची संधी मिळतेय याचा मला खूप आनंद होतोय की, मी प्रथमच तिच्यासोबत गात आहे. तसेच रोहितचेही कौतुक त्याने अगदी कमी वयात इतक सर्व प्रोडक्शन जमून आणलय.       

टॅग्स :नेहा राजपाल