Join us

गायक राहुल देशपांडे झळकणार 'ह्या' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 07:15 IST

शास्त्रीय गायन मैफल, संगीत नाटक यानंतर आता राहुल देशपांडे लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत आणि तेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ठळक मुद्देराहुल देशपांडे 'अमलताश' या चित्रपटात मुख्य भूमिकेत

शास्त्रीय गायन मैफल, संगीत नाटक यानंतर आता राहुल देशपांडे लवकरच रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत आणि तेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'अमलताश'. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘अमलताश’ या चित्रपटाची निवड आगामी ‘मामी’ चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांच्यासोबत त्यांची बहीण दीप्ती माटेदेखील झळकणार आहेत.

राहुल देशपांडे यांनी याआधी बालगंधर्व, पुष्पक विमान या दोन चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. मात्र मुख्य भूमिकेत ते प्रथमच 'अमलताश' या चित्रपटात झळकणार आहेत. राहुल देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले होती की, मी माझा पहिला चित्रपट अमलताशच्या बाबतीत खूप उत्सुक आहे. या चित्रपटात माझ्या स्वरांसोबतच मीदेखील झळकणार आहे आणि तेही मुख्य भूमिकेत. ही खूप छान कथा आहे. या चित्रपटाची निवड मामी चित्रपट महोत्सवात झाली आहे. 

तसेच त्यांनी पुन्हा एकदा नुकतेच या चित्रपटाचा दुसरा पोस्टर शेअर करून या चित्रपटाबाबतीत खूप उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट असून, यात राहुल देशपांडेंबरोबर पल्लवी परांजपे या मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे यादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. याची कथा सुहास देसले यांची असून, त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. भूषण माटे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.         

टॅग्स :राहुल देशपांडे