Join us

नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 20:51 IST

Disha Parmar and Rahul Vaidya : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला आहे.

Disha Parmar Blessed With Baby Girl : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला असून दिशा आणि राहुल वैद्य आई-बाबा झाले आहेत. राहुलने अलीकडेच दिशाच्या ड्यू डेटचा खुलासा केला होता. खरं तर दिशाची ड्यू डेट १९ ते २५ सप्टेंबर असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण, आजच्याच दिवशी अर्थात २० तारखेला राहुल-दिशाच्या घरी 'लक्ष्मी'चं आगमन झालं आहे. 

दरम्यान, गायक राहुल वैद्यने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले, "आम्हाला मुलगी झाली आहे... आई आणि बाळ दोघंही चांगले आहेत आणि पूर्णपणे ठीक आहेत."

दिशा आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल भाष्य करायचं झालं तर, त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात सोशल मीडियावर एका कमेंटने झाली होती. राहुलचा एक म्युझिक व्हिडीओ पाहून दिशा प्रभावित झाली आणि तिने कमेंट केली. दिशा परमारची ही कमेंट पाहून राहुल खूश झाला. पहिल्या म्युझिक अल्बमच्या शूटिंगनंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. २०२० मध्ये 'बिग बॉस १४' शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केलं. या लव्हबर्ड्सनी १८ मे २०२३ रोजी सोशल मीडियावरून आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. 

टॅग्स :राहुल वैद्यटेलिव्हिजनसेलिब्रिटीबॉलिवूड